Samsung Galaxy M35 5G फोनवर Amazon देतोय आकर्षक ऑफर्स, अशी डील पुन्हा मिळणार नाही
Samsung ने Samsung Galaxy M35 5G स्मार्टफोन अलीकडेच लाँच केला.
Amazon च्या GIF सेलमध्ये SAMSUNG GALAXY M35 5G फोनवर ऑफर्सचा भारी वर्षाव सुरु आहे.
सेलमध्ये सर्व बँक कार्डवर 2000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल.
साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने Samsung Galaxy M35 5G स्मार्टफोन अलीकडेच लाँच केला होता. हा एक जबरदस्त स्मार्टफोन आहे, जो मिड-रेंजमध्ये सादर करण्यात आला होता. मात्र, हा फोन अगदी बजेट रेंजमध्ये खरेदी करण्यासाठी एक उत्तम संधी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन केवळ 14 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. Amazon च्या GIF सेलमध्ये फोनवर ऑफर्सचा भारी वर्षाव सुरु आहे. पाहुयात ऑफर्स-
Samsung Galaxy M35 5G ची किंमत आणि ऑफर्स
Samsung Galaxy M35 5G च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किमत सुमारे 19,999 रुपये आहे. तर, 8GB RAM सह 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किमत 21,499 रुपये आणि 8GB रॅमसह 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 24,499 रुपये इतकी आहे. Amazon सेलदरम्यान उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला सर्व बँक कार्डवर 2000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. याशिवाय, तुम्ही Amazon Pay द्वारे फोन खरेदी केल्यास 1000 रुपयांची वेगळी सूट मिळणार आहे.
याव्यतिरिक्त, SBI क्रेडिट कार्ड नॉन-EMI व्यवहारांवर 10% झटपट सूट, SBI डेबिट कार्ड व्यवहारांवर 10% त्वरित सूट, SBI क्रेडिट कार्ड्सवर 9 महिने आणि त्याहून अधिक कालावधीच्या EMI व्यवहारांवर ₹500 ची अतिरिक्त सूट इ. अनेक बँक ऑफर्स उपलब्ध आहेत. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.
Samsung Galaxy M35 5G चे फीचर्स आणि स्पेक्स
Samsung Galaxy M35 5G स्मार्टफोनमध्ये 6.6-इंच लांबीचा सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह सज्ज आहे, हा डिस्प्ले FHD+ पॅनेल आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, तुम्हाला फोनमध्ये Octa-core Exynos 1380 चिप मिळेल. या सॅमसंग फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP अँटी-शेक कॅमेरा आहे, जो OIS ने सुसज्ज आहे.
स्मार्टफोनमध्ये 8MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स आहे. फोनमध्ये 13MP सेल्फी कॅमेरा देखील उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन Android 14 सह One UI 6.1 ला सपोर्ट करतो, तुम्हाला फोनमध्ये 4 वर्षे OS आणि 5 वर्षे सुरक्षा अपडेट मिळतात. पॉवर बॅकअपसाठी, तुम्हाला स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी मिळते, जी कंपनीकडून 25W सपोर्टने सुसज्ज आहे.
डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile