Price Drop! Samsung Galaxy M05 स्वस्तात खरेदी करण्याची संधी, 50MP कॅमेरासह मिळतील Powerful फीचर्स 

Price Drop! Samsung Galaxy M05 स्वस्तात खरेदी करण्याची संधी, 50MP कॅमेरासह मिळतील Powerful फीचर्स 
HIGHLIGHTS

Samsung Galaxy M05 स्मार्टफोन 7,999 रुपये किमतीत लाँच केला.

या लो बजेट स्मार्टफोनची किंमत 1500 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

Samsung Galaxy M05 ड्युअल रियर कॅमेराला सपोर्ट करतो.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने सप्टेंबर महिन्यात भारतात आपला स्वस्त मोबाईल फोन Samsung Galaxy M05 लाँच केला. कंपनीने Samsung Galaxy M05 स्मार्टफोन 7,999 रुपये किमतीत लाँच केला होता. दरम्यान, आम्ही तुम्हाला सांगतो की, या लो बजेट स्मार्टफोनची किंमत 1500 रुपयांनी कमी करण्यात आली आहे, त्यानंतर Samsung Galaxy M05 फक्त 6,499 रुपयांना खरेदी करता येईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Samsung Galaxy M05 स्वस्तात खरेदी कसे करता येईल.

Also Read: Best Gaming Phones Under 15000: स्वस्त किमतीत गेमिंगसाठी 5 सर्वोत्तम फोन्स उपलब्ध, पहा यादी

Samsung Galaxy M05 ची किंमत

वर सांगितल्याप्रमाणे, Samsung Galaxy M05 ची लाँच किंमत 7,999 रुपये होती. आता या फोनचे दर 1500 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. त्यानंतर Samsung Galaxy M05 फोन 6,499 रुपयांना खरेदी करता येईल. या किमतीत तुम्ही फोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट खरेदी करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, या किमतीत हा फोन तुम्ही प्रसिद्ध इ-कॉमर्स वेबसाईट Amazon वरून खरेदी करण्यास सक्षम असाल. तसेच, या फोनवर आणखी ऑफर्स सुद्धा उपलब्ध आहेत. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Samsung Galaxy M05 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M05 स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच स्टाइल PLC LCD पॅनेलवर बनवली आहे, जी 16 दशलक्ष कलर आउटपुट देते. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या मोबाईलमध्ये MediaTek Helio G85 ऑक्टा कोर प्रोसेसर मिळेल. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅमसह 4GB व्हर्च्युअल रॅम तंत्रज्ञान देखील आहे. तसेच, हा फोन 64GB स्टोरेजला सपोर्ट करतो, जो मेमरी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येईल.

samsung galaxy m05

फोटोग्राफीसाठी, Samsung Galaxy M05 ड्युअल रियर कॅमेराला सपोर्ट करतो. त्याच्या मागील पॅनलवर, LED फ्लॅशसह सुसज्ज 50MP चा मुख्य सेन्सर प्रदान केला आहे, ज्यासह 2MP डेप्थ सेन्सर मिळतो. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. पॉवर बॅकअपसाठी, Samsung Galaxy M05 स्मार्टफोनमधेय 5000mAh ची बॅटरी आहे. ही मोठी बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी मोबाईलमध्ये 25W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo