Price Drop! 50MP सेल्फी कॅमेरासह येणाऱ्या Samsung Galaxy F55 5G वर तब्बल 6000 रुपयांची घसरण
Samsung ने आपल्या नवीनतम Samsung Galaxy F55 5G च्या किमतीत मोठी घसरण केली.
या स्मार्टफोनच्या किमतीत 6000 रुपयांची घसरण करण्यात आली आहे.
नव्या किमतीसह हा फोन Amazon India आणि अधिकृत वेबसाईटवर सूचिबद्ध
जर तुम्ही परवडणाऱ्या किमतीत Samsung चा नवा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने आपल्या नवीनतम Samsung Galaxy F55 5G च्या किमतीत मोठी घसरण केली आहे. या स्मार्टफोनच्या किमतीत 6000 रुपयांची घसरण करण्यात आली आहे. नव्या किमतीसह हा फोन Amazon India आणि अधिकृत वेबसाईटवर सूचिबद्ध करण्यात आला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात या फोनची नवी किंमत आणि सर्व तपशील-
Also Read: iQOO 13 First Sale: लेटेस्ट स्मार्टफोनची पहिली सेल भारतात आजपासून होणार सुरु, पहा ऑफर्स
Samsung Galaxy F55 5G ची नवी किंमत
वर सांगितल्याप्रमाणे, लेटेस्ट Samsung Galaxy F55 स्मार्टफोन Amazon वर तब्बल 6,100 रुपयांच्या सवलतीसह विक्रीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. कंपनी ही सूट या फोनच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटवर देत आहे. हा फोन कंपनीने लाँचच्या वेळी 26,999 रुपयांना सादर केला होता. किमतीततील कपात पाहता, हा फोन सध्या Amazon वर 20,899 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे.
तुम्ही बँक कार्डने फोन खरेदी केल्यास, तुम्हाला Amazon वर 2000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळेल. त्याबरोबरच, या फोनवर 17,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देखील दिला जात आहे. एवढेच नाही तर, हा फोन कंपनीच्या अधिकृत साइटवर देखील 20,999 रुपयांना उपलब्ध आहे. येथून खरेदी करा
Samsung Galaxy F55 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy F55 5G वापरकर्त्यांना 120Hz रिफ्रेश रेटसह मोठा 6.7-इंच लांबीचा HD प्लस सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये ब्रँडने क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 चिपसेट चांगल्या परफॉर्मन्ससाठी दिली. हा प्रोसेसर गेमिंगसह इतर ऑपरेशन्समध्ये चांगला स्पीड प्रदान करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळेल. या डिस्प्लेमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर तसेच, पाणी आणि धूळ संरक्षणासाठी IP67 रेटिंग मिळेल.
याव्यतिरिक्त, या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. या सेटअपमध्ये OIS सपोर्टसह 50MP प्राइमरी कॅमेरा लेन्स, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी, या डिव्हाइसमध्ये दीर्घकाळ टिकणारी 5000mAh बॅटरी आहे. याला क्विक चार्जिंगसाठी 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळेल.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile