Samsung Galaxy F15 5G फोन अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी, Flipkart वर Best ऑफर उपलब्ध। Tech News 

 Samsung Galaxy F15 5G फोन अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी, Flipkart वर Best ऑफर उपलब्ध। Tech News 
HIGHLIGHTS

Samsung Galaxy F15 5G फोन प्रचंड सवलतीसह उपलब्ध

HDFC बँकेच्या कार्डद्वारे फोनवर 1000 रुपयांची वेगळी सूट उपलब्ध

Samsung Galaxy F15 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Samsung Galaxy F15 5G फोन नुकताच भारतात लाँच झाला आहे. हा कंपनीच्या बजेट रेंजमध्ये फोन आहे. कमी किमतीत या फोनमध्ये तुम्हाला अनेक अप्रतिम फीचर्स मिळणार आहेत. विशेष म्हणजे या स्वस्त फोनमध्ये तुम्हाला 6000mAh ची जंबो बॅटरी मिळत आहे. हा फोन भारतीय बाजरात दोन स्टोरेज व्हेरिएंटसह उपलब्ध आहे. जर तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असेल तर, सध्या Samsung Galaxy F15 5G उत्तम ऑफर्ससह उपलब्ध आहे. जेणेकरून तुम्ही हा फोन अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात ऑफर्स-

हे सुद्धा वाचा: Air Gesture आणि Rainwater Touch सारख्या Attractive फीचर्ससह Realme Narzo 70 Pro 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News

Samsung Galaxy F15 5G
Samsung Galaxy F15 5G

Samsung Galaxy F15 5G ची किंमत

Samsung Galaxy F15 5G फोनचे 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल Flipkart सेल दरम्यान 12,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकतात. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला Samsung Axis Bank Infinite क्रेडिट कार्डद्वारे फोनवर 5000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. या संदर्भात तुम्ही 7,999 रुपयांमध्ये फोन खरेदी करू शकता. त्याबरोबरच, HDFC बँकेच्या कार्डद्वारे फोनवर 1000 रुपयांची वेगळी सूट उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Samsung Galaxy F15 5G फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy F15 5G फोनमध्ये 6.5 इंच फुल HD+ डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा फोन MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसरने सुसज्ज आहे. या प्रोसेसरसह तुम्हाला फोनमध्ये उत्तम परफॉर्मन्स आणि गेमिंग अनुभव मिळणार आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 4GB आणि 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज पर्याय देण्यात आले आहेत.

Samsung Galaxy F15 5G features
Samsung Galaxy F15 5G features

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F15 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा, 5MP सेकंडरी आणि 2MP चा तिसरा कॅमेरा दिला गेला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी मूलभूत कार्यांसह अधिक काळ टिकून राहण्याची क्षमता ठेवते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo