50MP कॅमेरा येणार आकर्षक Samsung स्मार्टफोन फोन फक्त 7,499 रुपयांमध्ये उपलब्ध, उद्यापर्यंत मिळेल Special ऑफर
Flipkart रिपब्लिक डे सेल अंतर्गत Samsung Galaxy F13 स्मार्टफोनवर प्रचंड सूट
हा सेल उद्या म्हणजेच 19 जानेवारीपर्यंत चालणार आहे.
सॅमसंग Axis बँक सिग्नेचर क्रेडिट कार्डद्वारे स्मार्टफोनवर 10% सूट
लोकप्रिय ई-कॉमर्स दिग्गज Amazon प्रमाणे Flipkart ने देखील प्रजासत्ताक दिनापूर्वी मर्यादित काळासाठी सेल सुरू केला आहे. फ्लिपकार्ट सेलदरम्यान विविध गॅझेट्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सवर प्रचंड सवलत आणि ऑफर्स उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, रिपब्लिक डे सेल अंतर्गत Flipkart Samsung Galaxy F13 स्मार्टफोनवर 50% ची डिस्काउंट देत आहे.
हे सुद्धा वाचा: Its Here! बहुप्रतीक्षित Samsung Galaxy S24 सिरीज AI फीचर्ससह लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स। Tech News
Samsung Galaxy F13 ची किंमत आणि ऑफर्स
Samsung हँडसेटची खरी किंमत 14,999 रुपये आहे. मात्र, प्रजासत्ताक दिनाच्या सेलदरम्यान Flipkart हा फोन फक्त 7,499 रुपयांमध्ये देत आहे. हा सेल उद्या म्हणजेच 19 जानेवारीपर्यंत चालणार आहे. एवढेच नाही तर, स्मार्टफोनची आणखी कमी किमतीत खरेदी करण्यासाठी फ्लॅट डिस्काउंटसह अतिरिक्त ऑफर्स देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.
बँक ऑफर्स
सेलदरम्यान, आणखी डिस्काउंट ऑफर देण्यासाठी फ्लिपकार्टने काही बँकांसोबत भागीदारी देखील केली आहे. सॅमसंग Axis बँक सिग्नेचर क्रेडिट कार्डद्वारे हा स्मार्टफोन खरेदी करून तुम्ही 2500 रुपयांपर्यंत 10% सूट मिळवू शकता. त्याबरोबरच, Samsung Axis Bank Infinity Credit Card वर 5000 रुपयांपर्यंत 10% सूट देखील दिली जात आहे. येथून खरेदी करा
EMI आणि एक्सचेंज ऑफर्स
जर तुम्हाला एकाच वेळी सर्व पैसे द्यायचे नसतील तर, हा सॅमसंग स्मार्टफोन EMI वर देखील खरेदी करता येईल. EMI दरमहा केवळ 264 रुपयांपासून सुरू होतो. याशिवाय Flipkart ग्राहकांना नवीन Galaxy F13 च्या बदल्यात जुने हँडसेट एक्सचेंज करण्यावर 6,990 रुपयांपर्यंत सूट देत आहे.
Samsung Galaxy F13 चे स्पेसिफिकेशन्स
हा Samsung स्मार्टफोन 6.6-इंच लांबीच्या फुल HD+ डिस्प्लेसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी फोन Exynos 850 प्रोसेसरने सुसज्ज आहे. त्याबरोबरच, हा फोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह जोडलेला आहे, जो मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येतो. यात फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP + 5MP + 2MP कॅमेरे समाविष्ट आहेत आणि समोर 8MP सेल्फी कॅमेरा देखील उपलब्ध आहे. हँडसेटमध्ये 6000mAh बॅटरी आहे, जी एका दिवसापेक्षा जास्त काळ टिकेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile