Samsung Galaxy F05 Discount: 7000 रुपयांअंतर्गत खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन, ही ऑफर पुन्हा मिळणार नाही 

Samsung Galaxy F05 Discount: 7000 रुपयांअंतर्गत खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन, ही ऑफर पुन्हा मिळणार नाही 
HIGHLIGHTS

Samsung Galaxy F05 कंपनीने 10,000 रुपयांच्या अंतर्गत लाँच करण्यात आला.

Samsung Galaxy F05 हा फोन केवळ 7000 रुपयांअंतर्गत खरेदी करण्याची संधी

SAMSUNG Galaxy F05 फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung च्या स्वस्त स्मार्टफोन Samsung Galaxy F05 वर मोठी सवलत उपलब्ध आहे. हा फोन कंपनीने अलीकडेच भारतात लाँच केला आहे. कमी कालावधीतच या फोनवर आकर्षक सवलती दिल्या जात आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, Samsung Galaxy F05 कंपनीने 10,000 रुपयांच्या अंतर्गत म्हणेजच बजेट किमतीत लाँच केला होता. मात्र, दिवाळीअंतर्गत या फोनवर मोठे डिस्काउंट ऑफर केले जात आहे. Flipkart वरून तुम्ही हा फोन केवळ 7000 रुपयांअंतर्गत खरेदी करण्यास सक्षम असाल. जाणून घेउयात ऑफर्स-

Also Read: दिवाळीला iPhone 15 Pro ची किंमत झाली कमी! येथे Apple च्या लोकप्रिय फोनवर मिळतोय जबरदस्त Discount

samsung-galaxy-f05.j
samsung-galaxy-f05.j

Samsung Galaxy F05 Offer

SAMSUNG Galaxy F05 फोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत Flipkart वर 9,999 रुपये आहे. मात्र, दिवाळी सेल अंतर्गत या फोनवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Flipkart दिवाळी सेल अंतर्गत SAMSUNG Galaxy F05 फोन 6,499 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. एवढेच नाही तर, तुम्ही हा फोन 229 रुपयांच्या सुरुवातीच्या EMI वर देखील खरेदी करू शकता. येथून खरेदी करा

Samsung Galaxy F05 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

SAMSUNG Galaxy F05 फोनमध्ये 6.74 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचे रिफ्रेश रेट 60Hz इतके आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, SAMSUNG Galaxy F05 फोन MediaTek Helio G85 प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. या प्रोसेसरसह हा फोन हे स्मूथ अनुभव शोधणाऱ्या गेमरसाठी एक उत्कृष्ट निवड बनला आहे. MediaTek Helio G85 हे MediaTek च्या G सिरीज लाइनअपमधील सर्वात प्रगत गेमिंग प्रोसेसर आहे.

Samsung-Galaxy-F05-Features
Samsung-Galaxy-F05-Features

कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, SAMSUNG Galaxy F05 फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 2MP सेकंडरी कॅमेरा उपलब्ध आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. तुम्ही जर सेल्फीचे शौकीन असाल तर, हा फ्रंट कॅमेरा तुमच्यासाठी बेस्ट आहे. पॉवर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरीसह येतो, यासह तुम्हाला फास्ट चार्जिंगचे समर्थन देखील मिळेल.

डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo