तुम्हाला देखील बजेटमध्ये एका भारी SAMSUNGचा फोन खरेदी करायचा आहे का ? असे असेल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक विशेष माहिती आहे. Samsung चा बजेट स्मार्टफोन म्हणजेच Samsung Galaxy F04 स्मार्टफोनवर मोठी सवलत उपलब्ध करण्यात आली आहे. ही सवलत इ- कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. यावर बँक ऑफर्ससह बरेच ऑफर्स मिळत आहेत. चला तर बघुयात हा फोन तुम्हाला किती स्वस्तात खरेदी करता येईल.
Samsung Galaxy F04च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत भारतात 11,499 रुपये ठेवण्यात आली होती. मात्र, आता हा फोन 7,499 रुपयांना फ्लिपकार्टवर सूचिबद्ध आहे. यावर फ्लिपकार्ट तब्बल 34% डिस्काउंट देत आहे. याशिवाय, यावर काही बँक ऑफर्स देखील मिळत आहेत.
जसे की, Samsung axis bank आणि DBS Bank Credit Card ने व्यवहार केल्यास तुम्हाला 10% पर्यंत सवलत दिली जाईल. याव्यतिरिक्त flipkart axis bank ने व्यवहार केल्यास तुम्हाला 5% कॅशबॅक देखील मिळेल.
ग्राहकांना bank of baroda, IDFC First bank, IndusIND बँक क्रेडिट कार्डने EMI व्यवहार केल्यास 10% सूट मिळणार आहे. जर तुम्हाला तुमचा जुना किंवा विद्यमान फोन एक्सचेंज करायचा असेल तर, 6,950 रुपयांची सूट तुम्हाला मिळणार आहे.
या फोनमध्ये 6.5इंच लांबीचा HD+LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याबरोबरच, यात Mediatek Helio p35 प्रोसेसरदेखील आहे. या फोनमध्ये 4GB रॅम देण्यात आली आहे, जी RAM PLUS फीचरद्वारे 8GB पर्यंत वाढवता येते. तसेच, 64GB इंटर्नल स्टोरेज या फोनमध्ये तुम्हाला मिळते. यात ऑथेंटिकेशनसाठी फेस अनलॉक फिचर मिळेल.
फोनला पॉवर देण्यासाठी 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी, फोनच्या रियरमध्ये 13MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP सेकंडरी डेप्थ कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा यामध्ये उपलब्ध आहे.