Samsung Galaxy A55 5G वर मिळतेय 6000 रुपयांची सूट, Amazon दिवाळी सेलमध्ये भारी ऑफर्स उपलब्ध 

Samsung Galaxy A55 5G वर मिळतेय 6000 रुपयांची सूट, Amazon दिवाळी सेलमध्ये भारी ऑफर्स उपलब्ध 
HIGHLIGHTS

Amazon Great Indian Festival सेल आता शेवटच्या टप्प्यात आहे.

Samsung च्या A सीरीज Samsung Galaxy A55 5G फोनची किंमत 35,999 रुपयांपासून सुरू होते

Amazon वरून हा फोन खरेदी केल्यास 6000 रुपयांची सूट उपलब्ध

प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर सध्या दिवाळी स्पेशल Great Indian Festival सेल सुरु आहे. हा सेल आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. सेलदरम्यान तुम्हाला सर्व इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर मोठ्या सवलती मिळत आहेत. तसेच, महागड्या स्मार्टफोन्सवर सुद्धा ऑफर्सचा चांगला वर्षाव होत आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला, अलीकडेच लाँच झालेल्या Samsung Galaxy A55 5G फोनबद्दल माहिती देणार आहोत. या फोनवर बँक ऑफर्स, EMI, कॅशबॅक ऑफर्स इ. उपलब्ध आहेत. जाणून घेऊयात सविस्तर-

Samsung Galaxy A55 5G
Samsung Galaxy A55 5G

Samsung Galaxy A55 5G ची किंमत आणि ऑफर्स

साऊथ कोरियाची टेक दिग्गज कंपनी Samsung च्या A सीरीज Samsung Galaxy A55 5G फोनची किंमत 35,999 रुपयांपासून सुरू होते. तर, या फोनच्या दुसऱ्या वेरिएंटची किंमत 42,999 रुपये इतकी आहे. तसेच, या फोनचा तिसरा म्हणजेच टॉप व्हेरिएंट 45,999 रुपयांना येतो. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सध्या Amazon वरून हा फोन खरेदी केल्यास 6000 रुपयांची सूट मिळत आहे. ही ऑफर सर्व बँकांच्या कार्डवर दिली जात आहे. हा फोन ब्लू आणि नेव्ही कलर ऑप्शन्समध्ये येतो. येथून खरेदी करा

Samsung Galaxy A55 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच फुल HD+ सुपर AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ प्रोटेक्शन देखील मिळेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये इनहाऊस चिप Exynos 1480 फोनमध्ये मिळेल. हा फोन Android 14 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करेल. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 8GB रॅम+ 128GB स्टोरेज, 8GB रॅम+ 256GB स्टोरेज आणि 12GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिएंट्स मिळतील.

samsung galaxy a55
samsung galaxy a55

फोटोग्राफीसाठी, या Samsung फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रिअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेटअ मध्ये, यात 50MP मुख्य कॅमेरा, 12MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 5MP मॅक्रो लेन्स आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 32MP कॅमेरा उपलब्ध आहे. चांगल्या फोटोग्राफीसाठी यात सुपर HDR व्हिडिओ मोड आहे. तसेच, फोन अल्ट्रा HD 4K मध्ये 30fps वर व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. पॉवर बॅकअपसाठी, स्मार्टफोन 5000mAh च्या मोठ्या बॅटरीने सुसज्ज आहे, जी 25W चार्जिंगला सपोर्ट करेल. चार्जिंगसाठी, या फोनमध्ये USB Type-C चार्जिंग पोर्ट उपलब्ध आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo