साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung चे स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. कंपनी आजकाल आपल्या स्मार्टफोन्सवर किंमत कपात आणि ऑफर्स जाहीर करत असते. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Samsung Galaxy A55 5G स्मार्टफोनवरील बेस्ट डीलबद्दल सांगणार आहोत. हा फोन तुम्ही Amazon वरून 3000 रुपये स्वस्त किमतीत खरेदी करू शकता.
Also Read: JioCinema Premium चा 89 रुपयांचा फॅमिली प्लॅन झाला स्वस्त, जाणून घ्या Best डिस्काउंट ऑफर
Samsung Galaxy A55 5G फोनचा 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 39,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास फोनवर 3000 रुपयांची सूट दिली जात आहे. या डिस्काउंटनंतर तुम्ही हा फोन 36,999 रुपयांना खरेदी करण्यास सक्षम असाल. फोन तुम्ही EMI ऑप्शनसह देखील खरेदी करू शकता, जो 1,939 रुपयांपासून सुरु होतो. येथून खरेदी करा
Samsung Galaxy A55 5G स्मार्टफोनमध्ये 6.6-इंच लांबीचा FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचे रिफ्रेश रेट 120Hz इतके आहे. चांगल्या कार्यक्षमतेसाठी, हा फोन Samsung Exynos 1480 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा फोन Android 14 आधारित One UI 6.1 वर काम करतो. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 8GB RAM + 128GB स्टोरेज, 8GB RAM + 256GB स्टोरेज आणि 12GB + 256GB स्टोरेज अशा तीन मॉडेल्समध्ये सादर करण्यात आला आहे.
Samsung Galaxy A55 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 5MP मॅक्रो सेन्सरचा समावेश आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.