तब्बल 4000 हजार रुपयांच्या सवलतीसह मिळतोय Samsung फोन, 50MP कॅमेरासह 5000mAH बॅटरी उपलब्ध

Samsung चा Samsung Galaxy A36 5G प्रचंड सवलतीसह उपलब्ध
Samsung Galaxy A36 5G फोन कंपनीने मध्यम श्रेणीत लाँच केला आहे.
Samsung Galaxy A36 5G मध्ये 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी मिळेल.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने Samsung Galaxy A36 5G खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, हीच योग्य वेळ आहे. सध्या या फोनवर तुम्हाला Amazon वर मोठी सूट मिळणार आहे. हा स्मार्टफोन कंपनीने गेल्या महिन्यात लाँच झाला. लक्षात घ्या की, या फोनवर ई-कॉमर्स साइट थेट सवलत आणि उत्तम बँक ऑफर्स देत आहे. फोनच्या विशेष स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी मिळेल. हा फोन मिड रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. Samsung Galaxy A36 5G ची किंमत आणि ऑफर्स जाणून घेऊयात-
Also Read: Realme Narzo 80 Pro आणि Realme Narzo 80x ची पहिली सेल आज, जाणून घ्या Best ऑफर्स
Samsung Galaxy A36 5G ची किंमत आणि ऑफर्स
Samsung Galaxy A36 5G चा 8GB + 128GB व्हेरिएंट Amazon वर 30,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. हा फोन गेल्या महिन्यात लाँचच्या वेळी 8GB+ 128GB व्हेरिएंटमध्ये 32,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला होता. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ई-कॉमर्स साइटवर HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 2000 रुपयांची त्वरित सूट मिळेल. ऑफर्सबद्दल अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Samsung Galaxy A36 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A36 5G मध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2340×1080 पिक्सेल आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Exynos 1380 प्रोसेसर दिला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 256GB इनबिल्ट स्टोरेज आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी हा फोन IP67 रेटिंगसह सुसज्ज आहे.
फोटोग्राफीसाठी, या फोनच्या मागील बाजूस 50MP चा प्राथमिक कॅमेरा, 12MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा, 8MP चा डेप्थ सेन्सर आणि 5MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP चा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ 5.3, GPS, NFC आणि USB टाइप-C पोर्ट यांचा समावेश आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile