Price Drop! 50MP मेन कॅमेरासह येणाऱ्या Samsung फोनच्या किमतीत मोठी कपात, पहा नवी किंमत

Samsung ने अलिकडेच Samsung Galaxy A16 5G फोन भारतात लाँच केला.
Samsung Galaxy A16 5G फोनच्या दोन्ही व्हेरिएंटवर 2000 रुपयांची सूट मिळणार आहे.
Samsung Galaxy A16 5G फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने अलिकडेच Samsung Galaxy A16 5G फोन भारतात लाँच केला. जर तुम्ही 8GB रॅम असलेला 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, आज आम्ही तुमच्यासाठी एक आकर्षक डील घेऊन आलो आहोत. या फोनच्या दोन्ही व्हेरिएंटवर 2000 रुपयांची सूट मिळणार आहे. हा फोन कंपनीने मध्यम श्रेणीमध्ये लाँच केला आहे. जाणून घेऊयात Samsung Galaxy A16 5G ची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: OnePlus 13R Discount: लेटेस्ट स्मार्टफोनवर हजारो रुपयांची सूट, आकर्षक टॉप 5 फीचर्स
Samsung Galaxy A16 5G ची किंमत आणि ऑफर्स
Samsung Galaxy A16 5G फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 18,999 रुपयांना लाँच करण्यात आला. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी आता हा व्हेरिएंट 2000 रुपयांची स्वस्तात ऑफर करत आहे. त्यानंतर, हा फोन फक्त 16,999 रुपयांना खरेदी करता येईल. तर, फोनचा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला हा 5G फोन 19,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा Samsung 5G फोन शॉपिंग साइट Amazon वर स्वस्त दरात विकला जात आहे. ऑफर्सबद्दल अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Samsung Galaxy A16 5G चे फीचर्स आणि स्पेक्स
Samsung Galaxy A16 5G मध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. ही वॉटरड्रॉप नॉच स्टाइलची सुपर AMOLED स्क्रीन आहे, जी 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. डिस्प्लेच्या संरक्षणासाठी यात गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन मिळेल. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा फोन MediaTek Dimensity 6300 ऑक्टा-कोर प्रोसेसरसह कार्य करतो. हा सॅमसंग मोबाईल IP54 प्रमाणित आहे, जो पाणी आणि धूळ पासून त्याचे संरक्षण करण्यास मदत करतो.
फोटोग्राफीसाठी, Samsung 5G फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. त्याच्या मागील पॅनलवर 50MP OIS सेन्सर आहे, जो 5MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सरसह एकत्रितपणे कार्य करतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, यात 13MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी Samsung Galaxy A16 5G मोबाईल फोनमध्ये 5,000mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे. हा फोन काही बेसिक कार्यांसह तब्बल दोन दिवसांपर्यंत टिकण्याची क्षमता ठेवतो.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile