50MP कॅमेरासह येणाऱ्या Samsung Galaxy A15 5G वर मिळतोय बंपर Discount, बघा ऑफर 

 50MP कॅमेरासह येणाऱ्या Samsung Galaxy A15 5G वर मिळतोय बंपर Discount, बघा ऑफर 
HIGHLIGHTS

लेटेस्ट Samsung Galaxy A15 5G स्मार्टफोन मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध

Samsung Galaxy A15 5G स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये

Amazon वर या Samsung Galaxy A15 5G फोनवर 1500 रुपयांची सूट मिळत आहे.

Samsung Galaxy A15 5G Discount: तुम्हाला बजेटमध्ये Samsung स्मार्टफोन खरेदी करायचे असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. सध्या लेटेस्ट Samsung Galaxy A15 5G स्मार्टफोन मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन बजेट किमतीत भारतीय बाजारात सादर करण्यात आला होता. फोनमध्ये 50MP कॅमेरा, 5000mAh, 8GB रॅम इ. पॉवरफुल स्पेक्स देण्यात आले आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेउयात Samsung Galaxy A15 5G वरील डिस्काउंट-

Also Read: अनेक AI फीचर्ससह Moto Razr 50 Ultra 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि आकर्षक ऑफर्स

Samsung Galaxy A15 5G स्मार्टफोन मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध

Samsung Galaxy A15 5G ची किंमत आणि ऑफर्स

Samsung Galaxy A15 5G स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये इतकी आहे. तर, फोनचा दुसरा व्हेरिएंट 19,499 रुपयांना येतो. हा स्मार्टफोन Amazon वर मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Amazon वर या फोनवर 1500 रुपयांची सूट मिळत आहे. लक्षात घ्या की, ही ऑफर फक्त SBI कार्डद्वारे पेमेंट केल्यावर उपलब्ध असेल. या फोनवर नो कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर देखील मिळणार आहे. येथून खरेदी करा

Samsung Galaxy A15 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung च्या या 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच लांबीचा सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6GB रॅमसह 128GB अंतर्गत स्टोरेज आहे. या हँडसेटचा टॉप व्हेरिएंट 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर देण्यात आला आहे.

Samsung Galaxy A15 5G Camera
Samsung Galaxy A15 5G Camera

Samsung Galaxy A15 5G स्मार्टफोनमध्ये चांगल्या फोटोग्राफीसाठी मागील बाजूस ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP मुख्य सेन्सर, 5MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स मिळेल. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 13MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी हे 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo