जर तुम्ही मिड-रेंज सेगमेंटमध्ये उत्तम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आताच्या घडीला Redmi Note 11 तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल. या फोनचा 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज वेरिएंट कंपनीच्या वेबसाइटवर 15,999 रुपयांच्या किंमतीसह सूचीबद्ध आहे. यावर कंपनी 1,500 रुपयांपर्यंत झटपट सूट देत आहे. या सवलतीसाठी, तुम्हाला SBI कार्डद्वारे पैसे द्यावे लागतील. याशिवाय, तुम्ही ICICI बँक कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 1,250 रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळू शकते. विशेष बाब म्हणजे या फोनच्या खरेदीवर कंपनी दोन महिन्यांसाठी YouTube Premium ची फ्री मेंबरशिप देखील देत आहे.
हे सुद्धा वाचा : भारीच की ! Samsungने लाँच केला Smart Upgrade Program , फक्त 70% पैसे देऊन घरी आणा नवीन टीव्ही
कंपनी या फोनमध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.43-इंच फुल एचडी + AMOLED डॉट डिस्प्ले देत आहे. फोनमध्ये असलेल्या या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे आणि टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. कंपनीचा स्मार्टफोन 6GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 128GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेजसह येतो. प्रोसेसर म्हणून तुम्हाला या फोनमध्ये Adreno 610 GPU सह Snapdragon 680 मिळेल.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह चार कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा समाविष्ट आहे. त्याबरोबरच, सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 13-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
AI फेस अनलॉक आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OS बद्दल बोलायचे झाले तर Redmi चा हा फोन Android 11 वर आधारित MIUI 13 वर काम करतो.