200MP कॅमेरासह येणाऱ्या लेटेस्ट Redmi Note 13 Pro वर मिळतोय भारी Discount, अशी डील पुन्हा मिळणार नाही

Updated on 21-Aug-2024
HIGHLIGHTS

लेटेस्ट Redmi Note 13 Pro स्मार्टफोन फोटोग्राफीसाठी 200MP कॅमेराने सुसज्ज आहे.

Redmi Note 13 Pro कंपनीने तीन व्हेरिएंटमध्ये सादर केला होता.

या फोनवर SBI बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 3000 रुपयांची सवलत उपलब्ध

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Redmi ने अलीकडेच Redmi Note 13 Pro फोन भारतीय बाजारात लाँच केला होता. हा स्मार्टफोन कंपनीने मिड बजेट रेंजमध्ये सादर केला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की, विशेष म्हणजे हा स्मार्टफोन फोटोग्राफीसाठी 200MP कॅमेराने सुसज्ज आहे. हा मजबूत कॅमेरा फोन अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी तुमच्याकडे चालून आली आहे. होय, या फोनवर प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon India वर भारी ऑफर्स उपलब्ध आहेत. पाहुयात ऑफर्स-

Also Read: आगामी Realme 13 सिरीजची भारतीय लाँच डेट कन्फर्म! पहा नव्या फोनचे लुक आणि अपेक्षित फीचर्स

Redmi Note 13 Pro ची किंमत आणि ऑफर्स

Redmi Note 13 Pro फोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 24,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. मात्र, याशिवाय या फोनवर मोठ्या डिस्काउंट ऑफर देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बँक ऑफर्समध्ये तुम्ही SBI बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 3000 रुपयांची सवलत मिळणार आहे. एवढेच नाही तर, यासह नो कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर देखील मिळणार आहेत. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Redmi Note 13 Pro चे फीचर्स आणि स्पेक्स

Redmi Note 13 Pro फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिफ्रेश रेट 120Hz इतके आहे. तर, यात डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस संरक्षण देखील देण्यात आले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज करण्यात आला आहे. हा फोन कंपनीने तीन व्हेरिएंट्समध्ये सादर केला आहे. यामध्ये 8GB RAM + 128GB स्टोरेज, 8GB RAM + 256GB आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट समाविष्ट आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये तुम्हाला 200MP Samsung ISOCELL HP3 प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे, जो OIS-EIS सपोर्टसह येतो. तसेच, यात 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सरचा समावेश आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16MP कॅमेरा मिळेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5100mAh बॅटरी आहे, जी 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सज्ज आहे. चार्जिंगसाठी फोनमध्ये टाइप-C पोर्ट उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :