200MP कॅमेरा असलेला Redmi Note 13 Pro+ 3000 रुपयांनी स्वस्त, ‘अशा’प्रकारे मिळेल ऑफरचा लाभ

Updated on 30-Jul-2024
HIGHLIGHTS

Redmi Note 13 Pro+ वर मिळतेय अप्रतिम ऑफर

Redmi Note 13 Pro+ मिड बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे.

Redmi Note 13 Pro+ फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 200MP प्रायमरी कॅमेरा मिळेल.

तुम्ही देखील असा एक नवा स्मार्टफोन खरेदी करू इच्छिता का? जो 200MP कॅमेरा आणि मिड बजेट रेंजमध्ये येतो. तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अलीकडेच लाँच झालेल्या Redmi Note 13 Pro+ वर मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल सांगणार आहोत. या फोनवर Amazon काही उत्तम सवलती ऑफर करत आहे. या फोनसह तुम्हाला अनेक पॉवरफुल फीचर्स देखील मिळणार आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Redmi Note 13 Pro+ वर मिळणारे ऑफर्स-

Also Read: Google Pixel 9 सिरीजची भारतीय लाँच डेट कन्फर्म! पहिला फोल्डेबल फोन करेल जबरदस्त एन्ट्री

Redmi Note 13 Pro+ ची किंमत आणि ऑफर्स

प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर Redmi Note 13 Pro+ फोनचा 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 30,999 मध्ये खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. या फोनवर तुम्हाला काही ऑफर्स देखील मिळत आहेत. जेणेकरून हा फोन तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. Redmi Note 13 Pro+ फोनवर निवडक बँक कार्डद्वारे खरेदी केल्यास तुम्हाला 3000 रुपयांची सूट मिळेल. तसेच, यावर नो कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफरदेखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Redmi Note 13 Pro+ 5G

Redmi Note 13 Pro+ चे तपशील

Redmi Note 13 Pro+ स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच लांबीचा कर्व AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी, फोन Mediatek Dimensity 7200 प्रोसेसरने सुसज्ज आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, MediaTek Dimensity 7020 प्रोसेसर निर्बाध मल्टीटास्किंग, उत्कृष्ट गेमिंग अनुभव आणि कार्यक्षम उर्जा वापर सुनिश्चित करतात. तसेच, ही चिपसेट 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते. हा फोन तीन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये 8GB RAM + 256GB, 12GB RAM + 256GB आणि 12GB RAM + 512GB स्टोरेज समाविष्ट आहे.

Redmi Note 13 Pro+ फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये प्रायमरी कॅमेरा 200MP आहे. यासह, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सर उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 16MP कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :