Redmi Note 13 Pro+ 5G मोठ्या Discount सह खरेदीसाठी उपलब्ध, जाणून घ्या नवी किंमत

Updated on 13-Aug-2024
HIGHLIGHTS

Redmi Note 13 सिरीज भारतात जवळपास 6 महिन्यांपूर्वी लाँच केली गेली.

सिरीजचा टॉप व्हेरिएंट Redmi Note 13 Pro+ 5G वर मोठी सूट उपलब्ध

Redmi Note 13 Pro+ 5G वर तुम्हाला प्रमोशनल सवलतींसह बँक सवलतीही उपलब्ध

लेटेस्ट Redmi Note 13 सिरीज भारतात जवळपास 6 महिन्यांपूर्वी लाँच करण्यात आली होती. सिरीजअंतर्गत येणाऱ्या स्मार्टफोन्स Note 13, 13 Pro आणि 13 Pro Plus भारतीय वापरकर्त्यांच्या भरपूर पसंतीस पडले. आम्ही तुम्हाला सांगतो की, विशेष बाब म्हणजे ग्राहकांना 200MP कॅमेरा असलेला REDMI Note 13 Pro+ 5G हा टॉप मॉडेल अधिक आकर्षक पर्याय वाटतो. यामुळे, ब्रँडने Redmi Note 13 Pro+ 5G पुन्हा एकदा डिस्काउंट आणि बँक ऑफर्स उपलब्ध केले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात Redmi Note 13 Pro+ 5G वरील ऑफर्स-

Also Read: लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Realme C63 5G भारतीय बाजरात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 13 Pro+ 5G वरील ऑफर्स

कंपनीने Redmi Note 13 Pro+ 5G वर आकर्षक ऑफर्स उपलब्ध करून दिले आहेत. या स्मार्टफोन्सवर तुम्हाला 1,500 रुपये प्रमोशनल सवलत आणि 2,000 रुपयांची बँक सूट देखील मिळणार आहे. या संदर्भात तुम्हाला एकूण 3,500 रुपयांपर्यंतचा लाभ मिळेल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, ही ऑफर ऑफलाइन रिटेल स्टोअर्स आणि कंपनीच्या वेबसाइटवर लाईव्ह आहे.

या ऑफरसह तुम्हाला 1,500 रुपयांच्या सवलतीनंतर, 8GB RAM + 256GB स्टोरेजसह Redmi Note 13 Pro+ 5G ची किंमत 29,499 रुपये आहे. तर, मिड मॉडेल 12GB + 256GB सवलतीनंतर तुम्हाला 31,499 रुपये आणि टॉप व्हेरिएंट 12GB + 512GB सवलतीनंतर 33,499 रुपयांमध्ये मिळणार आहे. बँक ऑफरनंतर, बेस मॉडेल 27,499 रुपयांना, मिड मॉडेल 29,499 रुपयांना आणि टॉप मॉडेल 31,499 रुपयांना मिळणार आहे.

Redmi Note 13 Pro+ 5G वरील इ-कॉमर्स साईटवरील ऑफर्स

Redmi Note 13 Pro+ 5G वर Flipkart वर देखील 1,500 रुपयांची प्रमोशनल सवलत दिली जात आहे. त्याबरोबरच, ग्राहकांना येथे ICICI बँक कार्ड खरेदी केल्यास 10% सूट देखील मिळेल, जे सुमारे 750 रुपयांपर्यंत आहे. तर, Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर वापरकर्त्यांना 5% कॅशबॅक देखील दिला जाईल. यासह तुम्हाला EMI आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ देखील मिळेल.

Redmi Note 13 Pro+ 5G फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Redmi 13 Pro Plus मध्ये 6.67-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शन उपलब्ध आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 7200 Ultra प्रोसेसरदेखील उपलब्ध आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. ज्यामध्ये OIS सह 200MP Samsung ISOCELL HP3 प्रायमरी सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2MP मॅक्रो सेन्सर आणि 16MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी, यात 120W जलद चार्जिंगसह मोठी 5,000mAh बॅटरी मिळेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :