Xiaomi ची Redmi Note 13 Pro सीरीज 2024 च्या सुरुवातीला भारतात लाँच
Redmi Note 13 Pro 5G सध्या 7000 रुपयांच्या सवलतीसह मिळेल.
Redmi Note 13 Pro 5G स्मार्टफोन 3 स्टोरेज व्हेरिएंटमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Xiaomi ने Redmi Note 13 Pro सीरीज 2024 च्या सुरुवातीला भारतात लाँच केली होती. तेव्हापासून या सिरीजमधील स्मार्टफोन भारतीय वापरकर्त्यांच्या खूप पसंतीस पडले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, Redmi Note 13 Pro 5G सध्या 7000 रुपयांच्या सवलतीसह विकला जात आहे. खास गोष्ट म्हणजे तुम्ही 200 MP चा फोन नो कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफरसह खरेदी करू शकता. जाणून घेऊयात Redmi Note 13 Pro 5G ची किंमत आणि त्यावरील ऑफर्स-
Redmi Note 13 Pro 5G स्मार्टफोन 3 स्टोरेज व्हेरिएंटमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे. सध्या सर्वात मोठ्या मॉडेल 12GB+256GB मॉडेलवर 3,000 रुपये आणि 4,000 रुपयांची सवलत मिळेल. यासह, तुम्हाला 7000 रुपयांची पूर्ण सूट मिळेल. हा फोन केवळ 22,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, या फोनची किंमत लाँचच्या वेळी 29,999 रुपये होती. Buy From Here
8GB RAM + 256GB मॉडेलवर 3,000 रुपये फ्लॅट आणि 3000 रुपयांची बँक सूट मिळेल. यासह फोनची किंमत 21,999 रुपये होईल. या फोनची किंमत लाँचच्या वेळी 27,999 रुपये इतकी आहे. Buy From Here
8GB RAM + 128 GB पर्याय तुम्हाला फक्त 19,999 रुपयांमध्ये मिळेल. यावर बँक आणि फ्लॅट डिस्काउंटसह 6,000 रुपयांची सूट देखील आहे. लाँचच्या वेळी या फोनची किंमत 25,999 रुपये होती.
वरील सर्व मॉडेल्सवर नो कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफरदेखील उपलब्ध आहे.
Redmi Note 13 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेक्स
Redmi Note 13 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. या स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शन उपलब्ध आहे. क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7S Gen 2 चिपसेट पॉवरफुल एक्सपेरियन्ससाठी मिळणार आहे. हा स्मार्टफोन Samsung ISOCELL HP3 सेन्सरसह 200MP प्रायमरी कॅमेराने सुसज्ज आहे. या प्रायमरी लेन्ससह 8MP अल्ट्रावाइड, 2MP मॅक्रो लेन्स आणि 16MP फ्रंट कॅमेरा आहे. मोबाईलमध्ये 5100mAh ची मोठी बॅटरी आहे, जी 67W टर्बोचार्ज फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह उपलब्ध आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.