200MP कॅमेरासह येणाऱ्या Redmi Note 13 Pro वर मिळतोय तब्बल 3,000 रुपयांचा Discount, बघा सर्वोत्तम डील

Updated on 05-Jul-2024
HIGHLIGHTS

Redmi Note 13 Pro स्मार्टफोन मोठ्या सवलतीसह उपलब्ध

Redmi Note 13 Pro फोन हा मिड बजेटमध्ये येणारा स्मार्टफोन आहे.

तुम्ही निवडक बँकांचे ग्राहक असल्यास तुम्हाला Redmi Note 13 Pro फोन स्वस्तात खरेदी करता येईल.

Xiaomi सब-ब्रँड Redmi अंतर्गत ‘नोट 13’ सिरीज 2024 च्या सुरुवातीला भारतात सादर करण्यात आली होती. या सिरीजअंतर्गत Redmi Note 13, Note 13 Pro आणि Note 13 Pro + लाँच करण्यात आले होते. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही सिरीज भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरली. आता यापैकी एक Redmi Note 13 Pro तुम्हाला 3,000 रुपयांनी कमी दरात खरेदी करण्याची संधी आहे. जाणून घेऊयात Redmi Note 13 Pro वरील Discount ऑफर्स-

Also Read: 50MP कॅमेरासह येणाऱ्या Samsung Galaxy A15 5G वर मिळतोय बंपर Discount, बघा ऑफर

Redmi Note 13 Pro ची किंमत

Redmi Note 13 Pro 5G फोन भारतात तीन स्टोरेज व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये बेस मॉडेल 8GB RAM+128GB स्टोरेज, दुसरा व्हेरिएंट 8GB RAM+ 256GB स्टोरेज आणि 12GB RAM+256GB स्टोरेज समाविष्ट आहेत. या फोनची किंमत अनुक्रमे 24,999 रुपये, 26,999 रुपये आणि 28,999 रुपये इतकी आहे.

Redmi Note 13 Pro वरील ऑफर्स

बँक ऑफर अंतर्गत Redmi Note 13 Pro वर 3,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने काही बँकांची निवड केली आहे, ज्यांचे ग्राहक हा स्मार्टफोन सवलतीसह खरेदी करू शकतात. 3,000 रुपयांच्या सवलतीसह स्मार्टफोन व्हेरिएंट तुम्ही अनुक्रमे 21,999 आणि 23,999 रुपये आणि 25,000 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. BUY FROM HERE

हा Redmi स्मार्टफोन आर्क्टिक व्हाइट, कोरल पर्पल, मिडनाईट ब्लॅक आणि स्कार्लेट रेड कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही ऑफर कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह Amazon वर उपलब्ध आहे. मात्र, लक्षात घ्या की, ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे.

Redmi Note 13 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 13 Pro 5G फोन 6.67 इंच लांबीच्या फुल HD+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 7S Gen 2 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, यात 200MP मेन कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स देखील आहेत. आकर्षक सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP कॅमेरा उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 5,100mAh बॅटरीला सपोर्ट करतो, जी 67W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :