Redmi Note 12 5G च्या किमतीत प्रचंड सवलत, आणखी स्वस्तात खरेदी करा बजेट स्मार्टफोन
Redmi Note 12 5G कमी किमतीत खरेदी करा.
ऑफर अंतर्गत तुम्हाला संपूर्ण 15,350 रुपयांची सवलत मिळेल.
नॉन EMI पेमेंट केल्यास तुम्हाला 2 हजार रुपयांची सूट उपलब्ध
Redmi कंपनी बजेटमध्ये उत्तम स्मार्टफोन्स देण्यासाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही देखील जर नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. Redmi Note 12 5G तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. हा स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह खरेदी करता येणार आहे. म्हणूनच हा फोन घेण्यास तुम्हाला खिशाला जास्त ताण द्यावा लागणार नाही.
Redmi Note 12 5G ची किंमत
तुम्ही Flipkart वरून REDMI Note 12 5G चा 128GB स्टोरेज आणि 4GB RAM व्हेरिएंट मोठ्या सवलतीसह खरेदी करू शकता. या फोनची MRP 19,999 रुपये आहे, पण 15% डिस्काउंटनंतर 16,999 रुपयांना हा फोन खरेदीसाठी उपलब्ध आहे. यासोबतच अनेक बँक ऑफर्सही यावर सुरु आहेत.
ऑफर्स :
फ्लिपकार्ट Axis बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळणार आहे. HDFC बँक क्रेडिट कार्डवरून नॉन EMI पेमेंट केल्यास तुम्हाला 2 हजार रुपयांची सूट देखील मिळणार आहे. तसेच, ICICI बँक क्रेडिट कार्ड नॉन EMI वर पर्यायासह पेमेंट केल्यास देखील 2 हजार रुपयांची सूट आहे. येथून खरेदी करा
त्याबरोबरच, जर तुमच्याकडे पेमेंट जुना किंवा विद्यमान फोन एक्सचेंज करण्यासाठी उपलब्ध असेल तर, एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला संपूर्ण 15,350 रुपयांची सवलत मिळेल. यासाठी तुमचा जुना किंवा विद्यमान फोन उत्तम स्थितीत असण्याची शक्यता आहे.
Redmi Note 12 5G चे मुख्य तपशील
6.67 इंच लांबीचा फुल HD + डिस्प्ले फोनमध्ये मिळणार आहे. फोनमधील क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 Gen 1 प्रोसेसर स्पीड देखील उत्तम स्पीड देतो. त्याबरोबरच, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 48MP चा आहे आणि 13MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. याशिवाय, फोनमध्ये 5000 mAh बॅटरी उपलब्ध आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile