Redmi चा बजेट स्मार्टफोन अप्रतिम ऑफरसह उपलब्ध, Amazon वरून खरेदी करा

Updated on 18-May-2023
HIGHLIGHTS

Redmi Note 12 5G च्या खरेदीवर Amazon वर मस्त ऑफर्स

Redmi Note 12 5G एक बजेट स्मार्टफोन आहे.

फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे वाढवता येईल

 नुकताच लाँच झालेला बजेट स्मार्टफोन Redmi Note 12 5G च्या खरेदीवर Amazon वर मस्त ऑफर्स मिळत आहेत. हा Redmi फोन 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह येतो. फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. तसेच, हा फोन Android 12 वर आधारित MIUI वर काम करतो. Redmi Note 12 5G ऑफरसह खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. चला बघुयात ऑफर्स – 

Redmi Note 12 5G वरील ऑफर्स

Redmi Note 12 5G तीन व्हेरिएंटमध्ये येतो. म्हणजेच हा फोन 4GB RAM + 64GB, 6GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज या व्हेरिएंटमध्ये येतो. फोनच्या बेस मॉडेलची किंमत 16,999 रुपये आहे. तर, इतर दोन व्हेरिएंट अनुक्रमे 18,999 रुपये आणि 20,999 रुपये आहेत.

ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, काही निवडक बँक कार्ड्सवर 1,500 रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळत आहे. तसेच, तुम्हाला हा फोन फक्त 812 रुपयांपासून सुरू होणार्‍या EMI सह पर्यायासह देखील खरेदी करता येईल.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Redmi च्या या 5G फोनमध्ये 6.67-इंच लांबीचा FHD + AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 4 Gen 1 प्रोसेसरवर काम करतो. फोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज आहे. फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे वाढवता येईल. सिक्योरिटीसाठी यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. 

त्याबरोबरच, Redmi Note 12 5G मध्ये 5000mAh बॅटरी आहे. वर सांगितल्याप्रमाणे, हा फोन Android 12 वर आधारित MIUI वर काम करतो. तसेच, फोटो काढण्यासाठी फोनमध्ये 48MP प्राइमरी, 8MP अल्ट्रा वाइड आणि 2MP मॅक्रो कॅमेरा मिळणार आहे. समोरील बाजूस फोनमध्ये 16MP कॅमेरा आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :