AI फीचर्सने सज्ज Redmi 14 Pro+ 5G स्मार्टफोनवर भारी Discount, मिळतेय तब्बल 5000 रुपयांची सूट

Updated on 23-Dec-2024
HIGHLIGHTS

Redmi कंपनीने Redmi 14 Pro सिरीज भारतात लाँच केली आहे.

Redmi 14 Pro+ 5G स्मार्टफोनवर सध्या मोठ्या प्रमाणात डिस्काउंट आणि ऑफर्स उपलब्ध

Redmi 14 Pro+ 5G स्मार्टफोन अनेक AI फीचर्ससह सज्ज

प्रसिद्ध टेक जायंट Redmi चे स्मार्टफोन्स भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. अलीकडेच कंपनीने Redmi 14 Pro सिरीज भारतात लाँच केली आहे. त्यापैकी Redmi 14 Pro+ 5G स्मार्टफोनवर सध्या मोठ्या प्रमाणात डिस्काउंट आणि ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर तुम्हाला मोठ्या प्रमाणात ऑफर्स मिळणार आहेत. हा स्मार्टफोन कंपनीने मिड बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. चला तर मग जाणून घेऊयात Redmi 14 Pro+ 5G ची किंमत आणि ऑफर्स-

Also Read: 50MP फ्रंट कॅमेरासह येणाऱ्या Vivo T3 Ultra 5G वर मिळतोय मोठा Discount, पहा Best ऑफर्स

Redmi 14 Pro+ 5G ची किंमत आणि ऑफर्स

प्रसिद्ध Redmi Note 14 Pro+ 5G फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत Flipkart वर 34,999 रुपये इतकी आहे. मात्र, हा फोन सध्या 4000 रुपयांच्या सवलतीसह केवळ 30,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 1000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. अशाप्रकारे, तुम्हाला या फोनवर 5000 रुपयांची सवलत मिळू शकते. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Redmi 14 Pro+ 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 14 Pro+ 5G फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा ॲडॅप्टिव्ह कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये 4nm Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. तसेच, वॉटर प्रोटेक्शनसाठी फोनला IP68 रेटिंग देण्यात आली आहे. फोनमध्ये अनेक AI फीचर्स देण्यात आले आहेत. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 12GB रॅम असे दोन रॅम पर्याय आहेत. तसेच, 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज ऑप्शन्स समाविष्ट आहेत.

याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी Redmi Note 14 Pro+ 5G फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्यासोबतच, 50MP सेकंडरी कॅमेरा आणि 8MP चा तिसरा कॅमेरा आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 20MP फ्रंट कॅमेरा मिळेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6200mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 90W हायपरचार्जचे समर्थन आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :