Price Drop! नवा फोन लाँचपूर्वीच Redmi 13 5G च्या किमतीत घसरण, पहा नवीन किंमत

Updated on 09-Dec-2024
HIGHLIGHTS

Redmi ने आपली Note 14 सिरीज भारतीय बाजारपेठेत सादर केली आहे.

मागील मॉडेल Redmi 13 5G च्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण

Axis, HDFC, Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड, IDFC आणि इतर काही बँकांकडून 1,500 रुपयांपर्यंत सूट

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Xiaomi चा सब-ब्रँड Redmi ने आपली Note 14 सिरीज भारतीय बाजारपेठेत सादर करणार आहे. मात्र, यापूर्वीच कंपनीने त्याच्या मागील मॉडेल Redmi 13 5G च्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण केली आहे. या फोनवर फ्लॅट डिस्काउंटसह बँक ऑफर आणि EMI ऑफर केली आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन आणि स्वस्त 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Redmi 13 5G ची किंमत-

Also Read: OnePlus Community Sale: फ्लॅगशिप किलरच्या प्रसिद्ध स्मार्टफोन्सवर मिळतोय बंपर Discount, पहा यादी

Redmi 13 5G

Redmi 13 5G ची किंमत आणि ऑफर

Redmi 13 5G फोनचा 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 13,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. तर,
या फोनचा 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 15,499 रुपयांना लाँच करण्यात आला होता. सध्या Redmi 13 5G स्मार्टफोनवर Flipakrt वर 2,200 पेक्षा जास्त फ्लॅट डिस्काउंट आणि 1,500 पर्यंतची बँक ऑफर दिली जात आहे. बँक ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही मॉडेल्सवर Axis, HDFC, Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड, IDFC आणि इतर काही बँकांकडून 1,500 रुपयांपर्यंत सूट मिळेल. हा फोन हवाईयन ब्लू, ब्लॅक डायमंड आणि स्टायलिश ऑर्किड पिंक कलर ऑप्शन्समध्ये येतो. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Redmi 13 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Redmi 13 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.79 इंच लांबीचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हे Widevine L1 ला देखील समर्थन देते. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी गोरिला ग्लास 3 प्रोटेक्शन देण्यात आली आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेट मिळेल. सॉफ्टवेअरबद्दल बोलायचे झाले तर, Redmi 13 5G Android 14 वर आधारित Xiaomi HyperOS वर कार्य करेल. सुरक्षिततेसाठी, या फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 108MP प्राथमिक कॅमेरा आणि मागील बाजूस 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,030mAh बॅटरी आहे. त्याबरोबरच, हा फोन 33W चार्जरसह येतो. फोनमधील इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5G सिम सपोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक,आणि USB Type-C पोर्ट यासारखी अनेक फीचर्स असतील.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :