Realme P1 Speed 5G फोन भारतात ऑक्टोबर महिन्यात लाँच करण्यात आला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की, Realme ने पॉवर सिरीज बजेट रेंज अंतर्गत सादर केली आहे. फोनच्या 8GB रॅम मॉडेलची किंमत 17,999 रुपये इतकी आहे. तर, फोनच्या 12GB RAM ची किंमत 20,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. परंतु, आजपासून हा मोबाईल फोन स्वस्त दरात खरेदी करता येणार आहे. कंपनी या Realme 5G फोनवर खूप मोठी सूट देत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Realme P1 Speed 5G फोनवरील ऑफर्स-
Also Read: नवा TECNO POP 9 भारतात उत्तम फीचर्ससह लाँच! किंमत 7 हजारांपेक्षा कमी, पहा टॉप 5 फीचर्स
लक्षात घ्या की, Realme P1 Speed 5G फोनच्या 8GB रॅम वेरिएंटवर 3,000 रुपयांची सूट दिली जात आहे. या सवलतीसह या फोनची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी होईल. तर, 12GB रॅम व्हेरिएंट 2,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. या ऑफरअंतर्गत, 8GB + 128GB ची किंमत 14,999 रुपये आणि 12GB + 256GB ची किंमत 19,999 रुपये होईल.
आम्ही तुम्हाला सांगतो की, हा Realme 5G फोन 3000 रुपयांनी स्वस्तात मिळवण्यासाठी ग्राहकांना SBI, ICICI, Axis, CBC, DBS आणि HDFC बँक कडून पेमेंट करावे लागेल. सध्या हा प्लॅन 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून 23 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत आहे. या डीलचा लाभ तुम्हाला realme.in आणि Flipkart वर घेता येईल.
Realme P1 Speed 5G फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा FHD+ OLED Esports डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटवर कार्य करतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 7300 Energy 5G चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, त्याच्या ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये सेकंडरी AI लेन्ससह 50MP चा मुख्य सेन्सर आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, हा फोन 16MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगसाठी समर्थन देते.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.