लेटेस्ट Realme P1 5G बजेट स्मार्टफोनवर मिळतोय मोठा Discount, किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी
कंपनीने Realme P1 5G स्मार्टफोन काही काळापूर्वी लाँच केला आहे.
सध्या Realme P1 5G फोन लाँच किंमतीपेक्षा 3,000 रुपयांनी स्वस्तात मिळत आहे.
फोटोग्राफीसाठी Realme P1 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने मागील वर्षी भारतीय बाजारपेठेत आपली नवीन ‘P सिरीज’ लाँच केली आहे. या अंतर्गत कंपनीने Realme P1 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा 5G मोबाईल बजेटमध्ये सादर करण्यात आला आहे. त्यांनतर, आता 3000 रुपयांच्या सवलतीसह हा स्मार्टफोन खरेदी केला जाऊ शकतो. सध्या Realme P1 5G लाँच किंमतीपेक्षा 3,000 रुपये स्वस्तात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जाणून घेऊयात Realme P1 5G ची किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील-
Also Read: VI युजर्सना पुन्हा झटका! कंपनीने वाढवली लोकप्रिय प्लॅनची किंमत, जाणून घ्या नवे दर
Realme P1 5G ची किंमत आणि ऑफर्स
Realme ने Realme P1 5G स्मार्टफोनवर सर्वप्रथम ऑफर सुरू केली आहे. ही ऑफर फोनच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटवर उपलब्ध आहे. हे दोन्ही व्हेरिएंट भारतात अनुक्रमे 15,999 रुपये आणि 16,999 रुपये किंमतीसह लाँच करण्यात आले होते.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 1,000 रुपयांची सवलत आणि 2,000 रुपयांची बँक ऑफर दिली जात आहे. म्हणजेच ऑफर अंतर्गत, 6GB रॅम 12,999 रुपयांना आणि 8GB रॅम 13,999 रुपयांना खरेदी करता येईल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनचा लाभ कंपनीच्या अधिकृत वेबसाइट realme.in आणि शॉपिंग साइट Flipkart वर मिळू शकतो. येथून खरेदी करा
Realme P1 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Realme P1 5G फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा फुल HD + डिस्प्ले देण्यात आला आहे आहे. ही स्क्रीन AMOLED पॅनेलवर बनवली आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटसह येते. यासह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये MediaTek च्या डायमेंसिटी 7050 ऑक्टा-कोर प्रोसेसर उपलब्ध आहे. हा मोबाइल 8GB व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो, फिजिकल रॅमसह यात एकूण 16GB पर्यंत रॅम मिळेल. या फोनची स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी Realme P1 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. त्याच्या मागील पॅनलवर 50MP चा Sony LYT600 सेन्सर प्रदान केला आहे, जो 2MP ब्लॅक अँड व्हाइट सेन्सरसह कार्य करतो. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी, हा फोन 45W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 5000 mAh बॅटरी मिळेल, जी कंपनीच्या दाव्यानुसार 0 ते 50% पर्यंत फक्त 28 मिनिटांत आणि 65 मिनिटांत 100% पूर्ण चार्ज होईल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile