Realme Narzo Week Sale 22 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजता सुरू झाला आहे.
30 नोव्हेंबरपर्यंत Amazon आणि Realme वेबसाइटवर या ऑफरचा लाभ घेता येईल.
Realme Narzo 60 5G वर 2000 रुपयांचे डिस्काउंट कूपन मिळणार आहे.
Realme च्या ‘Narzo Week Sale’ च्या निमित्ताने कंपनीने त्याच्या निवडक स्मार्टफोन्सवर खास ऑफर जाहीर केल्या आहेत. ज्यात Realme Narzo 60 Series, Narzo N55 आणि Narzo N53 यांचा समावेश आहे. लक्षात घ्या की, Narzo Week Sale 22 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजता सुरू झाला आहे. इच्छुक ग्राहक 30 नोव्हेंबरपर्यंत Amazon आणि Realme वेबसाइटवर या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Realme Narzo सिरीजचा भारतात 12.3 दशलक्ष इतका मोठा वापरकर्ता आधार आहे, असा कंपनीचा दावा आहे. हे सिरीज पुढील पिढीच्या ग्राहकांसाठी डिझाइन केलेली आहे.
Realme सेल दरम्यान, ग्राहकांना Realme Narzo 60 Pro 5G च्या 12GB + 1TB मॉडेलवर 3000 रुपयांचे कूपन मिळू शकते. तर 4000 रुपयांची कूपन ऑफर 12GB + 256GB आणि 8GB + 128GB व्हेरिएंटवर उपलब्ध आहे.
कंपनी Realme Narzo 60 5G वर 2000 रुपयांचे डिस्काउंट कूपन मिळणार आहे.
अलीकडेच लाँच झालेल्या Realme Narzo N55 या स्मार्टफोनच्या 6GB + 128GB व्हेरिएंटवर 1000 रुपयांच्या कूपनसह 2000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते.
लोकप्रिय Realme Narzo N53 च्या 8GB + 128GB व्हेरिएंटवर 2000 रुपयांचे डिस्काउंट कूपन उपलब्ध आहे.
Realme Narzo सिरीज
अलीकडेच लाँच झालेल्या Realme Narzo 60 Pro चे डिझाईन Martian Horizon वरून प्रेरित आहे, असे कंपनीने सांगितले आहे. या डिवाइसमध्ये 120Hz कर्व डिस्प्ले आणि 100MP OIS कॅमेरा देखील आहे. याशिवाय, यात 5000mAh ची बॅटरी आहे, जी 67W Supervooc चार्जिंगला सपोर्ट करते. तर, स्टॅंडर्ड Narzo 60 प्रीमियम विगन लेदर आणि Martian Horizon डिझाइनसह येतो. हा हँडसेट 90Hz सुपर AMOLED डिस्प्लेसह येतो. हे डायमेंसिटी 6020 5G चिपसेटने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, यात 2x इन-सेन्सर झूम आणि 20z डिजिटल झूमसह 64MP मुख्य कॅमेरा आहे.
यानंतर, लाँच होताच लोकप्रिय झालेल्या Narzo N55 मध्ये 8MP सेल्फी कॅमेरा, MediaTek Helio G88 चिप आणि 12GB पर्यंत डायनॅमिक रॅम आहे. हा फोन Android 13 वर आधारित Realme UI 4.0 वर चालतो. त्याबरोबरच, Narzo N53 स्मार्टफोन 33W फास्ट चार्जिंग, 50MP AI कॅमेरा आणि Unisoc T612 चिपसेट आणि 8MP फ्रंट कॅमेरासह येतो.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.