एअर जेश्चरसह येणाऱ्या Realme स्मार्टफोनवर मिळतेय मोठी सूट, Best ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध

Updated on 11-Jul-2024
HIGHLIGHTS

Realme Narzo 70 5G स्मार्टफोन अलीकडेच भारतात लाँच झाला होता.

Realme Narzo 70 5G स्मार्टफोन अप्रतिम सवलतीसह खरेदी करण्याची संधी

Realme Narzo 70 5G सह कंपनीने नव्या 'एअर जेश्चर' आणि 'रेनवॉटर टच' फीचरची ओळख करून दिली.

Realme ने अलीकडेच आपल्या स्मार्टफोन्समध्ये नव्या टेक्नॉलॉजीची ओळख करून दिली आहे. कंपनीने Realme Narzo 70 5G स्मार्टफोन अलीकडेच भारतात लाँच केला आहे. या नव्या स्मार्टफोन्ससह कंपनीने नव्या ‘एअर जेश्चर’ आणि ‘रेनवॉटर टच’ फीचरची ओळख करून दिली आहे. जर तुम्ही देखील Realme Narzo 70 5G स्मार्टफोन खरेदी करण्यास इच्छुक असाल तर, आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. Realme चा हा स्मार्टफोन सवलतीसह अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. जाणून घेऊयात Realme Narzo 70 5G वरील ऑफर्स-

Also Read: Samsung Galaxy Unpacked Event 2024: मेगा इव्हेंटदरम्यान लाँच झाले नवे Samsung Galaxy Z Fold 6 आणि Flip 6, AI फीचर्ससह सुसज्ज

Realme Narzo 70 5G ची किंमत आणि ऑफर्स

Realme ने या Realme Narzo 70 5G स्मार्टफोनच्या 6GB + 128GB आणि 8GB + 128GB कॉन्फिगरेशनसाठी 2000 रुपयांची कूपन सूट जाहीर केली आहे. फोनचा 6GB रॅम मॉडेल कंपनीच्या वेबसाइटवर 16,999 रुपयांमध्ये सूचीबद्ध आहे. 8GB रॅम वेरिएंट सध्या 16,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Realme Narzo 70 5G

ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीच्या 2000 रुपयांच्या मर्यादित कूपन डिस्काउंटसह तुम्ही हे फोन खरेदी करण्यास सक्षम आहात. सवलतीसह या फोनची सुरवातीची किंमत 13,999 रुपयांपर्यंत खाली येईल. तर, टॉप व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपयांपर्यंत येईल.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, ही कूपन्स 11 जुलैपासून म्हणजेच आजपासून Amazon India आणि Realme India ई-स्टोअरवर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असतील. याव्यतिरिक्त, वरील दोन्ही व्हेरिएंटवर 3 महिन्यांसाठी नो-कॉस्ट EMI पर्याय मिळेल.

Realme Narzo 70 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme मधील हा 5G हँडसेट 6.67-इंच लांबीच्या AMOLED डिस्प्लेसह येतो, जो FHD+ रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेटच्या समर्थनासह आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 7050 SoC द्वारे समर्थित आहे जो Mali G68 GPU सह जोडलेला आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये IP54 रेटिंग, रेनवॉटर स्मार्ट टच, एअर जेश्चर आणि बरेच अप्रतिम फीचर्स देण्यात आले आहेत.

Realme Narzo 70 5G Features

कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या डिव्हाइसमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 2MP मोनो कॅमेरा आहे. तर, समोरच्या बाजूला मध्यभागी पंच-होल कटआउटवर 16MP सेल्फी स्नॅपर मिळेल. पॉवरसाठी, हा फोन 5000mAh बॅटरीवर चालतो, जो 45W SuperVOOC फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करतो. याव्यतिरिक्त, हा हँडसेट Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित Realme UI 5 सह येतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :