भारीच की ! 50MP कॅमेरा असलेला Realme फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, वाचा डिटेल्स

भारीच की ! 50MP कॅमेरा असलेला Realme फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, वाचा डिटेल्स
HIGHLIGHTS

Realme Narzo 50 स्मार्टफोनवर मिळतेय प्रचंड सूट

कंपनीच्या वेबसाईटवर Realme Days सेल सुरु

या फोनची किंमत 15,499 रुपये

Realme ने युजर्ससाठी एक उत्तम ऑफर आणली आहे. कंपनीच्या वेबसाइटवर सुरू असलेल्या Realme Days सेलमध्ये तुम्ही Realme Narzo 50 6 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. कंपनीने या फोनची किंमत 15,499 रुपये आहे. यावर कंपनी 100 रुपयांची झटपट सूट देत आहे. या सवलतीसाठी, तुम्हाला ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करावे लागेल. फोन स्पीड ब्लॅक आणि स्पीड ब्लू कलर पर्यायांमध्ये येतो. 120Hz डिस्प्ले आणि 50 मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरा व्यतिरिक्त यात अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा : 84 दिवसांच्या वैधतेसह रिलायन्स JIOचा सर्वात जबरदस्त प्लॅन, मिळेल Disney + Hotstar मोफत

Realme Narzo 50

फोनमध्ये कंपनी 120Hz च्या रिफ्रेश रेटसह फुल HD + अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले देत आहे. या डिस्प्लेचा स्क्रीन-टू-बॉडी रेशो 90.8% आहे आणि टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. 6GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 128GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजसह, तुम्हाला या फोनमध्ये 5GB वर्च्युअल रॅम सपोर्ट देखील मिळेल.

या Realme फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. जोपर्यंत OS चा संबंध आहे, हा फोन Android 11 वर आधारित Realme UI 2.0 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी, Wi-Fi आणि ब्लूटूथ 5.1 व्यतिरिक्त, सर्व स्टॅंडर्ड ऑप्शन दिले गेले आहेत.

प्रोसेसर म्हणून कंपनी त्यात MediaTek Helio G96 गेमिंग चिपसेट देत आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 50-मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरा व्यतिरिक्त, यात 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आणि 2-मेगापिक्सेल ब्लॅक आणि वाइड लेन्सचा समावेश आहे. कंपनी आकर्षक सेल्फीसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा इन-डिस्प्ले कॅमेरा देत आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo