महागड्या Realme स्मार्टफोनवर मिळतेय हजारो रुपयांची सूट! Best ऑफर्ससह खरेदी करण्याची संधी

Updated on 22-Oct-2024
HIGHLIGHTS

Flipkart वर Realme GT Neo 3T स्मार्टफोन सध्या मोठ्या सवलतीसह उपलब्ध

Realme GT Neo 3T डिव्हाइस तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला होता.

Realme GT Neo 3T फोनवर डिस्काउंटसह बँक, एक्सचेंज ऑफर आणि EMI पर्याय देखील उपलब्ध आहेत.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme चा फ्लॅगशिप GT सीरीज स्मार्टफोन खरेदी करण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. खरं तर, प्रसिद्ध इ-कॉमर्स कंपनी Flipkart वर Realme GT Neo 3T स्मार्टफोन सध्या 10,200 रुपयांपर्यंत कमी किमतीत विकला जात आहे. एवढेच नाही तर, या फोनवर डिस्काउंटसह बँक, एक्सचेंज ऑफर आणि EMI पर्याय देखील उपलब्ध आहेत. लक्षात घ्या की, भारतीय बाजारपेठेत या स्मार्टफोनला खूप पसंती मिळाली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Realme GT Neo 3T फोनची किंमत आणि ऑफर्स-

Also Read: तुमच्या प्रियजनांना दिवाळीत नवा Smartphone गिफ्ट करायचंय? पहा 10 हजार रुपयांअंतर्गत Best ऑप्शन्स

Realme GT Neo 3T वरील ऑफर्स

Realme ने Realme GT Neo 3T डिव्हाइस तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केला होता. लाँचच्या वेळी टॉप व्हेरिएंट 8GB RAM + 256 GB स्टोरेजची किंमत 33,999 रुपये होती. आता या फोनवर 10,200 रुपयांची सूट दिली जात आहे. या ऑफरनंतर हा डिव्हाइस केवळ 23,799 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल. हा फोन डॅश यलो, ड्रिफ्टिंग व्हाइट आणि शेड ब्लॅक अशा तीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार केल्यास तुम्हाला 5% अतिरिक्त कॅशबॅक मिळेल. तसेच, तुम्हाला 24 महिन्यांपर्यंत EMI पर्याय देखील मिळणार आहे. एक्सचेंज ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही तुमच्या जुन्या डिव्हाइसवर 12,950 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. मात्र, एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या डिव्हाइसच्या स्थितीनुसार लागू होईल. येथून खरेदी करा.

Realme GT Neo 3T चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme GT Neo 3T मध्ये 6.62-इंच फुल-HD+ E4 AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षण देण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट आहे, तर ग्राफिक्ससाठी ॲड्रेनो 650 जीपीयू स्थापित करण्यात आला आहे. यात 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज आहे. तर, डायनॅमिक रॅम सपोर्टसह 16GB पर्यंत रॅम वाढवण्याची सुविधा देखील आहे.

फोटोग्राफीसाठी, Realme GT Neo 3T मध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये तुम्हाला 64MP प्राथमिक कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2MP इतर लेन्स मिळतील. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 16MP लेन्स उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह प्रदान करण्यात आली आहे. फोनमधील उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोन डॉल्बी ATMOS, हाय-रिस ऑडिओ, VC कुलिंग आणि सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज आहे. कनेक्टिव्हिटीमध्ये 5G, Wi-Fi 6, Bluetooth 5.2, GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट देखील उपलब्ध आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :