Best Offer! Realme GT Neo 3 वर मिळतेय तब्बल 20,500 रुपयांचा Discount, आश्चर्यकारक डील पुन्हा मिळणार नाही

Updated on 22-Jan-2024
HIGHLIGHTS

Realme GT Neo 3 वर विशेष सवलत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

फोन सध्या Amazon वरून 42% डिस्काउंटसह विकला जात आहे.

Amazon वरून खरेदी केल्याने तब्बल 20,000 रुपयांपेक्षा जास्त बचत

भारतीय बाजारात प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme चे स्मार्टफोन्स लोकप्रिय झाले आहेत. Realme युजरच्या प्रत्येक गरजेला पूर्ण करण्यासाठी नवनवीन फीचर्ससह फोन लाँच करत असते. जर तुम्ही फोन चार्ज करण्यासाठी तासनतास थांबू शकत नसल्यास, तुम्ही 150W फास्ट चार्जिंग असलेला फोन विकत घ्यावा. होय, Realme GT Neo 3 वर विशेष सवलत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे हा फोन Amazon वरून खरेदी केल्याने तुमची तब्बल 20,000 रुपयांपेक्षा जास्त बचत होईल. बघुयात फोन आणि ऑफरशी संबंधित सर्व तपशील-

Realme GT Neo 3 किंमत आणि ऑफर्स

Realme GT Neo 3 फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत Amazon वर 45,999 रुपये आहे. मात्र, Realme GT Neo 3 वर उपलब्ध ऑफरबद्दल बोलायचे तर, हा फोन सध्या Amazon वरून 42% डिस्काउंटसह विकला जात आहे. हा फोन डिस्काउंटनंतर तुम्ही 25,499 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. ही एक उत्तम डील आहे, जी परत परत मिळणार नाही. येथून खरेदी करा

Realme GT Neo 3 फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme GT Neo 3 मध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz आहे. हा फोन Mediatek Dimensity 8100 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे.

फोटोग्राफीसाठी Realme GT Neo 3 फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे. या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यासोबतच 8MP चा सेकंडरी कॅमेरा आणि 2MP चा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 16MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, बॅकअपसाठी फोनमध्ये 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 150W सुपरफास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :