महागड्या Realme फोनवर तब्बल 9000 रुपयांचा Discount, 32MP सेल्फी कॅमेरासह भारी फीचर्स उपलब्ध

Realme ने गेल्या वर्षी भारतात आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme GT 6T लाँच केला.
Realme GT 6T फोन आता तब्बल 9000 रुपयांच्या कमी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध
आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 32MP फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने गेल्या वर्षी भारतात आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme GT 6T लाँच केला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन कंपनीने मिड बजेट रेंजमध्ये सादर केला होता. जर तुम्हाला देखील हा फोन खरेदी करायचा असेल तर, हीच योग्य वेळ आहे. हा फोन आता तब्बल 9000 रुपयांच्या कमी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जाणून घेऊयात Realme GT 6T ची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: Refrigerator Deals: घरासाठी नवा फ्रिज हवाय? जास्त विज बिल येण्याची चिंता नाही, पहा सर्वोत्तम डील्स
Realme GT 6T ची किंमत आणि ऑफर्स
Realme GT 6T च्या 8GB रॅमसह 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत कंपनीने 32,999 रुपये इतकी ठेवली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, या व्हेरिएंटची किंमत ब्रँडने आधी 4000 रुपयांनी कमी केली होती. आता ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 5000 रुपयांची कूपन सूट दिली जात आहे.
अशाप्रकारे, realme GT 6T लाँचिंग किमतीपेक्षा 9 हजार रुपयांच्या स्वस्त दरात खरेदी करता येईल. या ऑफर्ससह हा फोन प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर उपलब्ध आहे. येथून खरेदी करा!
Realme GT 6T चे फीचर्स आणि स्पेक्स
Realme GT 6T 5G मध्ये 6.78-इंच लांबीचा 1.5K डिस्प्ले देण्यात आला आहे. ही 8T LTPO AMOLED स्क्रीन आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटसह बनली आहे. प्रोटेक्शनसाठी, हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो, जो 3D गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 ने संरक्षित आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, स्नॅपड्रॅगन 7+ Gen 3 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन IP65 प्रमाणित आहे, जो तो पाणी आणि धूळ पासून सुरक्षित ठेवतो.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील पॅनलमध्ये 50MP चा मुख्य OIS LYT600 सेन्सर आहे, जो 8MP IMX355 वाइड-अँगल लेन्ससह कार्य करतो. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 32MP फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 5500mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही शक्तिशाली बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 120W ची फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile