प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने आपला स्वस्त 5G स्मार्टफोन Realme C63 5G या वर्षी ऑगस्ट महिन्यात लाँच केला होता. महत्त्वाचे म्हणजे लाँचच्या अगदी काही महिन्यांतच मोबाईल फोनवर 1,500 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही देखील बजेट किमतीत नवा 5G स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर, ही डील तुमच्यासाठी उपयुक्त आहे. जाणून घेऊयात Realme C63 5G ची किंमत आणि त्यावरील ऑफर्स-
Also Read: Price Drop! Samsung Galaxy M05 स्वस्तात खरेदी करण्याची संधी, 50MP कॅमेरासह मिळतील Powerful फीचर्स
Realme ने आपला Realme C63 5G स्मार्टफोन तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केला. फोनच्या बेस मॉडेलवर 1,000 रुपये आणि इतर दोन मॉडेल्सवर 1,500 रुपयांची बँक सूट उपलब्ध आहे. ही सूट जवळपास सर्व बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर मिळणार आहे. दरम्यान, या सवलतीसह तुम्हाला फोनचा 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 11,499 रुपयांना मिळेल. या डिव्हाइसचा मिड-रेंज 6GB RAM + 128GB व्हेरिएंट सध्या फक्त 10,499 रुपयांना खरेदी करता येईल. तर, फोनचे बेस मॉडेल फक्त 9,999 रुपयांना व्रिकीसाठी उपलब्ध आहे.
बँक ऑफर व्यतिरिक्त तुम्हाला हे उपकरण नो कॉस्ट EMI द्वारे 3 महिन्यांच्या सुलभ हप्त्यांमध्ये खरेदी करता येईल. एक्सचेंज ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, यावर कंपनी 7,250 रुपयांपर्यंत ऑफर उपलब्ध आहे. हा फोन तुम्ही स्टाररी गोल्ड आणि फॉरेस्ट ग्रीन अशा दोन कलर ऑप्शन्ससह खरेदी करू शकता. येथून खरेदी करा
Realme C63 5G मध्ये 6.67-इंच लांबीची HD+ स्क्रीन आहे, जी चार डायनॅमिक रिफ्रेश रेट 50Hz, 60Hz, 90Hz आणि 120Hz ला सपोर्ट करते. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेट देण्यात आली आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 8GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंत स्टोरेज समाविष्ट आहे. डिव्हाइसला पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी IP54 रेटिंग मिळाले आहे.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी फील्ड ऑफ व्ह्यू आणि 5P लेन्ससह 32MP AI मुख्य कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. त्याबरोबरच, यात AI ब्युटीसह सुसज्ज 8MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी, हा फोन 10W क्विक चार्जिंग फीचरसह सुसज्ज आहे, ते रिव्हर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करते. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 5000mAh ची मोठी बॅटरी उपलब्ध आहे. तर, सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.