Realme ने Realme 12 Pro Plus 5G फोन भारतात जानेवारी महिन्यात लाँच केला. हा फोन Snapdragon 7s Gen 2 चिपसेटसह सादर केला गेला आहे. या स्टायलिश आणि आकर्षक लुकसह येणाऱ्या स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपयांपासून सुरू होते. परंतु सध्या Realme 12 Pro+ 5G फोनवर 4,000 रुपयांपर्यंत प्रचंड सूट मिळत आहे. त्याबरोबरच, अनेक ऑफर्स देखील मिळत आहेत. बघुयात सर्व ऑफर्स-
हे सुद्धा वाचा: Samsung Galaxy A15 5G फोन 3000 रुपयांनी झाला स्वस्त, Popular स्मार्टफोनची किंमत कंपनीने केली कमी। Tech News
Realme 12 Pro+ 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात तीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत 29,000 रुपये आहे. तर, 8GB+256GB व्हेरिएंटची किंमत 31,000 रुपये आणि अखेर, फोनच्या 12GB+256GB व्हेरिएंटची किंमत 33,999 रुपये इतकी आहे.
Realme 12 Pro+ 5G फोनच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटवर 4,000 रुपयांची बँक सवलत उपलब्ध आहे. तर, इतर 8GB RAM+256GB स्टोरेज आणि 12GB RAM+256GB व्हेरिएंटवर 3,000 रुपयांची ऑफर आहे. हा फोन हा सबमरिनर ब्लू, नेव्हिगेटर बेज आणि एक्सप्लोरर रेड कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल. या ऑफर्ससह हा फोन कंपनीच्या अधिकृत साईटवरून खरेदी करता येईल.
त्याबरोबरच, कंपनीच्या साईटवर 1500 रुपयांपर्यंतची MobiKwik कॅशबॅक ऑफर देखील असेल. याशिवाय, 3,699 रुपये किमतीचे Realme Buds Air 5 TWS इयरबड्स केवळ 1,999 रुपयांना उपलब्ध असतील.
Realme 12 Pro Plus 5G फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे, हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. उत्तम परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7S Gen 2 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये F/1.8 अपर्चरसह 50MP चा मुख्य सेन्सर, F/2.6 अपर्चरसह 64MP पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. तर, फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा देखील आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 5000mAh बॅटरीसह येतो, जी 67W फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह येईल.