Realme 11 5G स्मार्टफोन भारी Discount सह Flipkart वर उपलब्ध, फोटोग्राफीचा मिळेल अप्रतिम अनुभव

Updated on 11-Oct-2024
HIGHLIGHTS

Realme 11 5G सध्या मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे.

कंपनी सध्या बेस मॉडेल 8GB RAM + 128GB व्हेरिएंटवर 5,700 रुपयांची सूट देत आहे.

फोनमध्ये 108MP Samsung ISOCELL HM6 प्राइमरी कॅमेरा उपलब्ध

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme चे स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर, Realme 11 5G सध्या मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर ही डील खास तुमच्यासाठी आहे. खरं तर, Realme ने मागील वर्षी आपला Realme 11 5G स्मार्टफोन लाँच केला होता. पाहुयात किंमत आणि ऑफर्स-

Also Read: Best Smartphones Under 10k: अगदी कमी किमतीत येतात जबरदस्त 5G फोन्स, पहा यादी

Realme 11 5G ची किंमत आणि ऑफर्स

Realme 11 5G चे 8GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेल आता फक्त 13,999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनी सध्या बेस मॉडेल 8GB RAM + 128GB मेमरी वर 5,700 रुपयांची सूट देत आहे, त्यानंतर याची किंमत केवळ 13,299 रुपये झाली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरल्यास, तुम्हाला 5% अतिरिक्त कॅशबॅक देखील मिळेल.

त्याबरोबरच, तुम्हाला तुमचा जुना फोन एक्सचेंज करायचा असले तर, तुम्हाला 8,150 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. याव्यतिरिक्त, जर तुम्हाला EMI वर डिव्हाइस खरेदी करायचे असेल तर 24 महिन्यांपर्यंतचा पर्याय देखील आहे. Buy From Here

Realme 11 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme 11 5G फोनमध्ये 6.72 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट सपोर्ट आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा फोन MediaTek Dimensity 6100+ octacore प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, 8GB RAM सह, 8GB डायनॅमिक रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज सपोर्ट उपलब्ध आहे. हे Android 13 आधारित Realme UI 4.0 वर आले आहे, जरी यास अधिक अपडेट्सदेखील प्राप्त झाली आहेत.

realme 11 5g

फोटोग्राफीसाठी, Realme 11 5G डिव्हाइस ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे. ज्यामध्ये F/1.7 अपर्चरसह 108MP Samsung ISOCELL HM6 प्राइमरी आणि 2MP सेकंडरी लेन्स आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा मिळेल. तसेच, पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी उपलब्ध आहे, जी 67W SuperVOOC फास्ट टेक्नॉलॉजीसह मिळणार आहे. ही बॅटरी बेसिक कार्यांसह दोन दिवसांपर्यंत टिकू शकते.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :