Realme ने नुकतेच Realme 12 Pro सिरीज भारतात लाँच केली आहे. ही सिरीज अनेक पॉवरफुल फीचर्ससह लाँच करण्यात आलेली आहे. Realme चे स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या Realme स्मार्टफोन्सचे लूक्स आणि स्टायलसिह डिझाईन चर्चेत आहेत. खरं तर, नवीनतम स्मार्टफोन्स सिरीज लाँच होताच जुन्या मॉडेल्सवर ऑफर्स देण्यात येत आहे. होय, अलीकडेच लाँच झालेल्या Realme 11 5G वर उत्तम सवलत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन अत्यंत स्टायलिश डिझाईनसह येतो. जाणून घेऊयात किंमत, ऑफर्स आणि संपूर्ण तपशील-
Realme 11 5G स्मार्टफोनची किंमत 18,999 रुपयांपासून सुरू होते. तर, फोनचा टॉप व्हेरिएंट देखील 19,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या Realme फोनच्या बेस व्हेरिएंटवर 1000 रुपयांची कूपन सूट आहे. याव्यतिरिक्त, किमतीवर 2000 रुपयांची सूट देखील आहे. तुम्ही ऑफरसह हा फोन 15,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तर, फोनचा टॉप व्हेरिएंट 17,999 रुपयांना खरेदी करता येईल.
हा स्मार्टफोन ग्लोरी गोल्ड आणि ग्लोरी ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये येतो. Realme Days अंतर्गत Realme 11 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. लक्षात घ्या की, Realme च्या अधिकृत वेबसाइटवरून फोन खरेदी करण्यावर कंपनी कूपन डिस्काउंट देत आहे.
या Realme स्मार्टफोनमध्ये 6.72 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्मार्टफोनमध्ये Mediatek Dimensity 6100+ 5G प्रोसेसर उपलब्ध आहे. हा फोन Android 13 वर आधारित realme UI 4.0 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. वर सांगितलेल्या स्टोरेज सेक्शनसोबतच या स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत डायनॅमिक रॅमचा पर्याय देखील देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील बाजूस 3X झूम कॅमेरासह 108MP मुख्य सेन्सर उपलब्ध आहे. याशिवाय, फोन 2MP पोर्ट्रेट लेन्सने सुसज्ज आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 16MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देखील आहे, जी 67W SUPERVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट उपलब्ध आहे.