Poco X5 5G Deal: अप्रतिम फीचर्ससह येणाऱ्या स्मार्टफोनवर मिळतोय थेट 25% डिस्काउंट

Updated on 19-Jun-2023
HIGHLIGHTS

Poco X5 5G वर तब्बल 25% डिस्काउंट मिळत आहे.

एक्सचेंज ऑफरद्वारे तुम्हाला या फोनवर 17,350 रुपयांची सूट मिळणार आहे.

फोनमध्ये आकर्षक फोटोग्राफी करण्यासाठी 48MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे.

जर तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा असेल तर, Poco X5 5G वर उत्तम डील सुरु आहे. खरं तर, ही दिल इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सुरु आहे. तुम्हाला या फोनवर तब्बल 25% डिस्काउंट मिळत आहे. म्हणेजच हा फोन 23,999 रुपयांऐवजी 17,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. एवढेच नाही तर यावर बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज डील देखील मिळत आहे. 

आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन खरेदी करताना जर तुम्हाला बँक ऑफर्सचा लाभ घ्यायचा असेल तर, Flipkart Axis Bank कार्डवर 5% कॅशबॅक उपलब्ध आहे. तसेच, एक्सचेंज ऑफरद्वारे तुम्हाला या फोनवर 17,350 रुपयांची सूट मिळणार आहे. मात्र, यासाठी तुमचा जुना किंवा विद्यमान फोन उत्तम स्थितीत असायला हवा. 

Poco X5 5G

Poco X5 मध्ये 6.67 इंच लांबीचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे, त्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे आणि पीक ब्राइटनेस 1200 nits आहे. डिस्प्लेमध्ये वरील बाजूस फ्रंट कॅमेरासाठी पंच होल देखील देण्यात आला आहे. डिव्हाइसमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर आणि 8GB पर्यंत RAM आणि 256GB इंटर्नल स्टोरेज देखील मिळेल. 

Poco X5 5G मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंग समर्थनासह येईल. तसेच, फोनमध्ये आकर्षक फोटोग्राफी करण्यासाठी 48MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरासह 8MPचा अल्ट्रावाईड आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर देखील आहे. आकर्षक सेल्फीसाठी Poco X5 5G मध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :