लेटेस्ट POCO C65 स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स 

लेटेस्ट POCO C65 स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स 
HIGHLIGHTS

डिसेंबर 2023 मध्ये कंपनीने स्वस्त स्मार्टफोन POCO C65 लाँच केला होता.

POCO C65 स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट Amazon आणि Flipkart वरून खरेदी करू शकता.

फोटोग्राफीसाठी, POCO C65 फोनमध्ये LED सह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Poco ने गेल्या वर्षी म्हणजेच डिसेंबर 2023 मध्ये आपला स्वस्त स्मार्टफोन POCO C65 लाँच केला होता. हा स्मार्टफोन लाँच होताच भारतीय वापरकर्त्यांनी या फोनला भरपूर पसंती दर्शवली. हे लक्षात घेऊन कंपनी या फोनवर 1,501 रुपयांची सूट देत आहे. हा फोन कंपनीने बजेट सेगमेंटमध्य सादर केला आहे, जो आणखी कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. जर तुम्ही कमी किंमतीचे उपकरण शोधत असाल तर हा एक चांगला पर्याय ठरेल.

Also Read: जबरदस्त Realme Narzo 70 Turbo 5G भारतात लाँच होण्यास सज्ज, मिळतील Powerful फीचर्स

poco c65 5g

POCO C65 वरील ऑफर्स

तुम्ही POCO C65 स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट Amazon आणि Flipkart वरून खरेदी करू शकता. Amazon वर या डिव्हाइसवर 1,501 रुपये म्हणेजच पूर्ण 36% सूट आहे. यानंतर फोनची किंमत फक्त 6,998 रुपये झाली आहे. ही डिवाइसच्या 4GB RAM + 128 GB मेमरी व्हेरिएंटची किंमत आहे, जी लाँचच्या वेळी 8,499 रुपये होती. फोनचे इतर स्टोरेज पर्याय म्हणजे 6GB RAM + 128GB व्हेरिएंट 7,499 रुपयांना आणि 8GB + 256GB व्हेरिएंट 10,998 रुपयांना उपलब्ध आहे.

POCO C65 स्मार्टफोन Flipkart वर 4GB RAM + 128GB स्टोरेजसह 6,999 रुपयांना उपलब्ध आहे. तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डच्या मदतीने 5% कॅशबॅक देखील मिळवू शकता. यासोबतच एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहे. तर, 6GB RAM + 128GB व्हेरिएंटची किंमत 7,499 रुपये आहे आणि 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे.

POCO C65 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Poco C65 5G

POCO C65 मध्ये 6.74-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी या फोनमध्ये गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन देखील आहे. या मोबाईलमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर देखील वापरण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये LED सह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP प्राथमिक, 2MP मॅक्रो लेन्स आणि AI लेन्स आहे. तर, सेल्फीसाठी समोर 8MP फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरीचे समर्थन देखील आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo