लेटेस्ट OPPO Reno11 5G वर तब्बल 5000 रुपयांचा Discount, मिळतेय बंपर ऑफर। Tech News

Updated on 02-Feb-2024
HIGHLIGHTS

नवीनतम स्मार्टफोन OPPO Reno11 5G प्रचंड डिस्काउंट ऑफर्स

Flipkart सुपर व्हॅल्यू डे सेलदरम्यान हा फोन अतिशय स्वस्त दरात उपलब्ध

बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 3000 रुपयांची सूट

Oppo Reno 11 5G हा Oppo कंपनीचा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. हा फोन आकर्षक डिझाईन आणि अप्रतिम कॅमेरा स्पेक्ससह लाँच करण्यात आला आहे. सध्या Flipkart सुपर व्हॅल्यू डे सेलदरम्यान हा फोन अतिशय स्वस्त दरात खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. Flipkart सेल 1 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून 5 फेब्रुवारीपर्यंत लाईव्ह असणार आहे. चला तर मग बघुयात OPPO Reno11 5G वरील डिस्काउंट ऑफर्स-

हे सुद्धा वाचा: iQOO Neo 9 Pro चे कॅमेरा स्पेक्स कन्फर्म! Powerful स्पेक्ससह स्मार्टफोन लवकरच होणार लाँच। Tech News

OPPO Reno11 5G वरील ऑफर्स

OPPO Reno11 5G फोनचे 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेल 29,999 रुपयांना Flipkart वरून खरेदी केले जाऊ शकते. OPPO Reno11 5G च्या डिस्काउंट ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 3000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. यासोबतच, एक्सचेंज ऑफर अंतर्गत 2000 रुपयांची एक्स्ट्रा ऑफ ऑफर उपलब्ध आहे. अशाप्रकारे, तुम्हाला स्मार्टफोनवर तब्बल 5000 रुपयांची सूट मिळणार आहे. येथून खरेदी करा

OPPO Reno11 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OPPO Reno11 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच लांबीचा 3D कर्व फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा फोन MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरने सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB आणि 256GB स्टोरेज पर्याय आहेत. यासह तुम्हाला स्टोरेजबद्दल चिंता करण्याचे काहीही कारण नाही.

याव्यतिरिक्त, OPPO Reno11 5G मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. यासोबतच 8MP चा सेकंडरी आणि 32MP चा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 67W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :