digit zero1 awards

Flipkart Super Value Days Sale: OPPO Reno8T 5G वर तब्बल 9000 रुपयांची सूट, आतापर्यंतची Best डील। Tech News

Flipkart Super Value Days Sale: OPPO Reno8T 5G वर तब्बल 9000 रुपयांची सूट, आतापर्यंतची Best डील। Tech News
HIGHLIGHTS

Oppo Reno8T 5G वर प्रचंड सवलतीसह खरेदी करण्याची संधी

सेल दरम्यान फोनवर तब्बल 9000 रुपयांची सवलत थेट दिली जात आहे.

HDFC बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 10% डिस्काउंट मिळणार आहे.

Flipkart Super Value Days Sale चा आज शेवटचा दिवस आहे. तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा असेल तर, सेलदरम्यान तुम्हाला स्मार्टफोन्सवर एकापेक्षा एक डिस्काउंट ऑफर्स मिळत आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Oppo Reno8T 5G वरील उपलब्ध ऑफर्सबद्दल सांगणार आहोत. हा कंपनीचा मिड-बजेट लोकप्रिय स्मार्टफोन आहे. सेलदरम्यान, या फोनवर Flipkart थेट सवलत आणि बँक ऑफर्स असे बरेच ऑफर्स देत आहे. वाचा सविस्तर-

हे सुद्धा वाचा: Good News! Amazon Prime Lite मेंबरशिपची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत आणि बेनिफिट्स । Tech News

oppo reno 8t 5g discount on croma
oppo reno 8t 5g discount

OPPO Reno8T 5G ची किंमत

Oppo Reno8T 5G स्मार्टफोनच्या 8GB RAM + 128GB ची Flipkart वर MRP 38,999 रुपये आहे. मात्र, Oppo Reno 8T 5G वर उपलब्ध असलेल्या डिस्काउंट ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, सेल दरम्यान फोनवर तब्बल 9000 रुपयांची सवलत थेट दिली जात आहे. डिस्काउंट ऑफरनंतर हहा फोन केवळ 29,999 रुपयांना साईटवर सूचिबद्ध करण्यात आला आहे. फोनवरील उपलब्ध इतर ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला HDFC बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 10% डिस्काउंट मिळणार आहे. येथून खरेदी करा

OPPO Reno8T 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Oppo Reno 8T 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा FHD+ कर्व AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा फोन उत्तम कार्यक्षमतेसाठी Qualcomm Snapdragon 695 5G चिपसह येतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, Oppo Reno 8T 5G फोनमध्ये 8GB + 8GB रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज आहे. तर, स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता देखील येते.

फोटोग्राफीसाठी या OPPO फोन ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये युएजर्सना 108MP प्रायमरी कॅमेरा मिळेल, जो तुम्हाला उत्तमोत्तम फोटोज क्लिक करण्यास सहकार्य करेल. तर, यात 2MP डेप्थ आणि 2MP मॅक्रो कॅमेरा सेन्सर देखील मिळणार आहे. सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंग/कॉन्फरन्सेससाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. या स्मार्टफोनची बॅटरी 4,800mAh आहे, ज्यासोबत तुम्हाला 67W SuperVOOC फास्ट चार्जिंग स्पीड मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo