12GB रॅम, 50MP मुख्य कॅमेरासह Oppo Reno 11 Pro 5G वर मोठे Discount, अप्रतिम ऑफर्सदेखील उपलब्ध| Tech News

12GB रॅम, 50MP मुख्य कॅमेरासह Oppo Reno 11 Pro 5G वर मोठे Discount, अप्रतिम ऑफर्सदेखील उपलब्ध| Tech News
HIGHLIGHTS

Oppo Reno 11 Pro 5G स्मार्टफोन मागील वर्षी भारतात लाँच केला गेला.

फोनमध्ये एकूण 12GB RAM आणि 50MP मेन कॅमेरासह पॉवरफुल फीचर्स मिळतील.

Flipkart वर फोनवर 4000 रुपयांची सूट उपलब्ध आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo चा Oppo Reno 11 Pro 5G स्मार्टफोन मागील वर्षी भारतात लाँच करण्यात आला होता. हा फोन कंपनीने मिड बजेट सेगमेंटमध्ये सादर केला. या फोनच्या विशेष स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, Oppo Reno 11 Pro 5G मध्ये एकूण 12GB RAM आणि 50MP मेन कॅमेरासह पॉवरफुल फीचर्स मिळतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, Flipkart या स्मार्टफोनवर अप्रतिम डिस्काउंट देत आहे. चला तर मग जाणून घेउयात Oppo Reno 11 Pro 5G वरील ऑफर्स-

हे सुद्धा वाचा: Price Cut! Redmi Note 13, Note 13 Pro आणि Note 13 Pro+ फोन झा स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत| Tech News

Oppo Reno 11 pro 5G

Oppo Reno 11 Pro 5G वरील ऑफर्स

Oppo Reno 11 Pro 5G स्मार्टफोनची किंमत 39,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फ्लिपकार्टवर फोनवर 4000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. ही ऑफर निवडक बँकांच्या कार्डवर उपलब्ध आहे. फोनवर 35 हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन पर्ल व्हाइट आणि रॉक ग्रे या दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Oppo Reno 11 Pro 5G

Oppo च्या या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा फुल HD+ कर्व AMOLED डिस्प्ले आहे, हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, स्मार्टफोनमध्ये Mediatek Dimensity 8200 प्रोसेसर देण्यात आला आहे. हे MediaTek Dimensity 8200 उच्च उर्जा कार्यक्षमतेच्या CPU साठी मानक सेट करते, जे वापरकर्त्यांना दीर्घ बॅटरी लाईफ, झिरो-लॅग ॲप्स आणि गेममध्ये वेगवान फ्रेम रेट्सना अनुमती देतो.

Oppo Reno 11 Pro 5G

फोटोग्राफीसाठी या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP मुख्य कॅमेरा, 32MP दुसरा सेन्सर आणि 32MP तिसरा सेन्सर आहे. फोनच्या फ्रंट कॅमेरामध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP कॅमेरा आहे. चांगल्या फोटोग्राफीसाठी फोनमध्ये अल्ट्रा पोर्ट्रेट कॅमेरा सिस्टीम, टेलिफोटो पोर्ट्रेट कॅमेरा यांसारखी फीचर्स उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनमध्ये 4600mAh बॅटरी आहे. हँडसेटमध्ये 80W SuperVOOC चार्जिंग सपोर्ट आहे. फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo