32MP सेल्फी कॅमेरासह Oppo Reno 10 5G वर मिळतायेत Best ऑफर्स, स्वस्तात खरेदी करण्याची संधी। Tech News

Updated on 06-Feb-2024
HIGHLIGHTS

Oppo Reno 10 5G स्मार्टफोन प्रचंड सवलतीसह खरेदी करा.

वन कार्ड क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर 5% सवलत उपलब्ध

फोटोग्राफीसाठी Oppo Reno 10 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.

Oppo Reno 10 5G स्मार्टफोन Oppo कंपनीचा लोकप्रिय स्मार्टफोन आहे. हा फोन कंपनीने मागील काळात मिड बजेट रेंज मधेय सादर केला होता. या फोनमध्ये तुम्हाला अनेक उत्तम फीचर्स वापरायला मिळतील. जर तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असले तर, Oppo Reno 10 विजय सेल्सच्या अधिकृत साइटवर उपलब्ध आहे. या डिव्हाइसवर जबरदस्त ऑफर्स दिल्या जात आहेत. याद्वारे हा फोन तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येणार आहे. बघुयात ऑफर्स-

हे सुद्धा वाचा: Upcoming Smartphones in February: IQOO पासून ते Nothing पर्यंत ‘या’ महिन्यात लाँच होणार Powerful स्मार्टफोन्स, बघा यादी। Tech News

Oppo Reno 10 5G ची किंमत आणि ऑफर्स

Oppo Reno 10 5G ची किंमत 32,999 रुपये ठेवण्यात आली आहे. वर सांगितल्याप्रमाणे, हा फोन सध्या ऑफर्ससह खरेदी करू शकता. फोनवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, वन कार्ड क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर 5% सवलत उपलब्ध आहे. फोनवर 1,600 रुपयांची EMI आणि एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. यासह तुम्हाला Oppo Reno 10 5G अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.

OPPO RENO 10 5G

Oppo Reno 10 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Oppo Reno 10 5G मध्ये 6.7-इंच लांबीचा कर्व AMOLED डिस्प्ले आहे. याचे रिझोल्यूशन 2412×1080 पिक्सेल आहे. या मोबाईलमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. त्याबरोबरच, फोनमध्ये MediaTek Dimensity 7050 चिपसेट अखंड कार्यासाठी प्रदान करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Dimensity 7050 हा एक सु-निर्मित चिपसेट आहे, जो स्मार्टफोनसाठी चांगला आहे. या चिपसेटमध्ये एक एकीकृत ऑक्टा-कोर युनिट आहे, जे अल्ट्रा-परफॉर्मन्स आणि चांगली उर्जा कार्यक्षमता देते.

Oppo Reno 10 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात पहिली 64MP, दुसरी 8MP आणि तिसरी 32MP लेन्स आहे. मेन कॅमेरासह तुम्ही अधिक रिझोल्यूशन आणि बारीकसारीक तपशीलांसह फोटोज कॅप्चर करू शकतो. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 32MP कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 5000mAh बॅटरीसह येतो. ज्यामध्ये 67W SuperVOOC फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. ही बॅटरी मूलभूत कार्यांसह तब्बल दोन दिवस टिकण्याची क्षमता ठेवते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :