32MP सेल्फी कॅमेरासह येणाऱ्या OPPO Find X8 5G फोनवर तब्बल 7000 रुपयांपर्यंत Discount, पहा Best ऑफर
आपला नवा स्मार्टफोन Oppo Find X8 5G भारतीय बाजारात लाँच
तुम्ही SBI बँक कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास तुम्हाला 6,999 रुपयांची सूट
OPPO Find X8 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 50MP Sony LTY-700 प्राथमिक कॅमेरा
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo ने अलीकडेच आपला नवा स्मार्टफोन Oppo Find X8 5G भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला कंपनीने महागड्या बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. मात्र, तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करण्यास इच्छुक असाल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. सध्या इ-कॉमर्स साईट Flipkart वर हा स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात सवलतीसह उपलब्ध आहे. ऑफर्सद्वारे तुम्हाला या स्मार्टफोनवर हजारो रुपयांची बचत करता येईल. जाणून घेऊयात OPPO Find X8 5G ची किंमत आणि त्यावरील ऑफर्स-
Also Read: Poco C75 5G Vs Moto G35 5G: दोन्ही लेटेस्ट बजेट स्मार्टफोन्समध्ये जबरदस्त स्पर्धा, कोण आहे Best?
OPPO Find X8 5G ची किंमत आणि ऑफर्स
लेटेस्ट OPPO Find X8 5G फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत Flipkart वर 79,999 रुपये इतकी आहे. मात्र, हा फोन आता 10,000 रुपयांच्या डिस्काउंटसह 69,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही SBI बँक कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास तुम्हाला 6999 रुपयांची सूट मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
OPPO Find X8 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
OPPO Find X8 5G स्मार्टफोनमध्ये 6.59 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, या डिस्प्लेचा रिफ्रेश दर 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, OPPO Find X8 5G फोन 3nm octa-core MediaTek Dimensity 9400 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा फोन 5G, 4G LTE सपोर्टसह येतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. यामध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज आणि 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज मॉडेलचा समावेश आहे. फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे वाढवता येईल.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP Sony LTY-700 प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. त्याबरोबरच, यासोबतच 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर देण्यात आला आहे. तसेच, या सेटअपमध्ये 50MP टेलिफोटो सेन्सर आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 5630Ah बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. याशिवाय फोनमध्ये 10W रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देखील आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile