अगदी निम्म्या किमतीत मिळतोय महागडा Oppo Find N3 Flip स्मार्टफोन, ‘या’ ठिकाणी भारी Discount उपलब्ध 

अगदी निम्म्या किमतीत मिळतोय महागडा Oppo Find N3 Flip स्मार्टफोन, ‘या’ ठिकाणी भारी Discount उपलब्ध 
HIGHLIGHTS

लोकप्रिय फोल्डेबल स्मार्टफोन OPPO Find N3 Flip मागील वर्षी भारतात लाँच केला गेला होता.

लाँचच्या वेळी OPPO Find N3 Flip फोनची किंमत सुमारे 1 लाख रुपये होती.

OPPO Find N3 Flip अर्ध्या किमतीत खरेदी करण्याची संधी आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo ने आपला लोकप्रिय फोल्डेबल स्मार्टफोन OPPO Find N3 Flip मागील वर्षी म्हणजेच 2023 ला लाँच केला होता. हा स्मार्टफोन लाँचच्या वेळी सुमारे 1 लाख रुपयांना सादर करण्यात आला होता. मात्र, आता हे उपकरण निम्म्याहून कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला ही भारी सवलत प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर मिळणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहुयात Oppo Find N3 Flip फोनवरील ऑफर्स-

OPPO Find N3 Flip ची किंमत आणि ऑफर्स

प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर सुरू असलेल्या सेल दरम्यान, OPPO Find N3 Flip फोल्डेबल स्मार्टफोन 50% डिस्काउंटसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर हा फोन सध्या फक्त 49,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. वर सांगितल्याप्रमाणे, लाँचच्या वेळी OPPO Find N3 Flip फोनची किंमत सुमारे 1 लाख रुपये होती. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 10% सूट उपलब्ध असेल.

OPPO Find N3 Flip अर्ध्या किमतीत खरेदी करण्याची संधी आहे.

त्याबरोबरच, तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरल्यास, तुम्हाला फोनसोबत 5% कॅशबॅक मिळेल. त्याबरोबरच, जर तुमच्याकडे जुना किंवा विद्यमान फोन एक्सचेंजसाठी उपलब्ध आहे तर, तुम्ही 36,300 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळवू शकता. येथून खरेदी करा

OPPO Find N3 Flip चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

oppo find n3 flip

Oppo Find N3 Flip मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.80-इंच लांबीचा फुल HD+ प्राथमिक AMOLED डिस्प्ले आहे. तर, 3.36 इंच लांबीचा AMOLED कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 9200 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये OIS सपोर्टसह 50MP सोनी IMX890 सेन्सर, 32MP टेलिफोटो लेन्स आणि 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स उपलब्ध आहेत. त्याबरोबरच, 32MP सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आला आहे. पॉवरसाठी, या फोनमध्ये 44W फास्ट चार्जिंगसह 4,300mAh बॅटरी उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo