Best Offer! Oppo Find N2 Flip महागडा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, मिळतोय तब्बल 8 हजार रुपयांचा Discount

Updated on 09-Jan-2024
HIGHLIGHTS

Oppo चा Find N2 Flip हा एक उत्तम स्मार्टफोन आहे.

Flipkart वरून हा फोन अनेक उत्तम ऑफर्ससह खरेदी करण्याची संधी

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो.

सध्या फोल्डेबल फोन्सचे क्रेझ तरुणाईमध्ये वाढतच चालले आहे. मात्र, फोल्डेबल फोन्स सध्या तुमचा खिसा पूर्ण रिकामा करणाऱ्या किमतीत म्हणजे महागड्या किमतीत येतात. पण तुम्हाला या फोनवर ऑफर मिळाले तर तुम्ही नक्कीच खरेदी करण्याचा विचार करू शकता. होय, Oppo Find N2 Flip हा एक उत्तम स्मार्टफोन आहे. हे उपकरण स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे, कारण त्यावर एक प्रचंड सवलत मिळत आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर-

हे सुद्धा वाचा: Latest Moto G34 5G स्मार्टफोन अखेर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स। Tech News

Oppo Find N2 Flip ची किंमत आणि ऑफर्स

Oppo Find N2 Flip प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर 89,999 रुपयांच्या किमतीत सूचीबद्ध आहे. या फोनवर अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फ्लिप स्मार्टफोनवर 8000 रुपयांचा बँक डिस्काउंट उपलब्ध आहे. याशिवाय फोनवर 28,300 रुपयांपर्यंतची नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. Oppo Find N2 Flip ऍस्ट्रल ब्लॅक आणि मुनलाइट पर्पल कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Oppo Find N2 Flip चे फीचर्स आणि स्पेक्स

Oppo ने या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंच लांबीची मेन स्क्रीन दिली आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2520×1080 पिक्सेल आहे. तर, यात 720×382 पिक्सेल रिझोल्यूशनचा डिस्प्ले 3.6 इंच लांबीचा आहे. फ्लिप फोनमध्ये MediaTek Dimensity 9000+ प्रोसेसर देण्यात आला आहे. या प्रोसेसरसह तुमचा फोन अगदी सुरळीत आणि वेगाने काम करण्यास सक्षम असेल.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमध्ये पहिला 50MP प्रायमरी सेन्सर आणि दुसरा 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्सचा समावेश आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा आहे. Oppo Find N2 फ्लिप फोन 4300mAh बॅटरीने सुसज्ज आहे, जो 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

स्मार्टफोनमध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :