Oppo F9 Pro एयरटेल ऑनलाइन स्टोर वरून घ्या विकत 3,915 रुपयांच्या वन-टाइम पेमेंट मध्ये
एयरटेल ही ऑफर आपल्या ऑनलाइन स्टोर्स वर दाखवत आहे, जिथे ग्राहक मार्केट मध्ये लेटेस्ट लॉन्च झालेले फोन्स विकत घेऊ शकतात, ज्यात Oppo F9 Pro पण आहे.
Airtel सध्या भारतात लॉन्च झालेल्या Oppo F9 Pro वर खास ऑफर देत आहे, हा डिवाइस 23,990 रुपयांऐवजी 3,915 रुपयांचे वन-टाइम पेमेंट करून विकत घेतला जाऊ शकतो. एयरटेल ही ऑफर आपल्या ऑनलाइन स्टोर्स वर दाखवत आहे, जिथे ग्राहक मार्केट मध्ये लेटेस्ट लॉन्च झालेले फोन्स विकत घेऊ शकतात. Oppo F9 Pro एकमात्र असा स्मार्टफोन नाही जो एयरटेल ऑनलाइन स्टोर वर उपलब्ध आहे, या स्मार्टफोंस मध्ये Samsung Galaxy Note 9, Galaxy S9 Plus, iPhone X, iPhone 8, Nokia 7 Plus, Galaxy A8 Plus आणि Google Pixel 2 यांचा पण समावेश आहे.
एयरटेल ऑनलाइन स्टोर मध्ये Oppo F9 Pro वर मिळत आहेत या ऑफर्स
या ऑफर अंतर्गत एयरटेल आपल्या ऑनलाइन स्टोर च्या माध्यमातून Oppo F9 Pro चा ट्वाईलाईट ब्लू आणि सनराइज रेड कलर वेरिएंट्स विकत आहे. कंपनी प्रति माह 50GB 4G डेटा, फ्री रोमिंग, अनलिमिटेड कॉल्स आणि एयरटेल टीवी चे फ्री सब्सक्रिप्शन पण ऑफर करत आहे.
आधी सांगितल्याप्रमाणे ग्राहक 3,915 रुपयांचे वन-टाइम पेमेंट करून डिवाइस विकत घेऊ शकतात. पण, यूजर्सना एका वर्षभर एयरटेल पोस्टपेड प्लान वापरावा लागेल, ज्यात यूजर्सना प्रतिमाह 2,099 रूपये द्यावे लागतील. या ऑफर अंतर्गत यूजर्सना वर्षभरात एकूण 29,103 रूपये द्यावे लागतील ज्यात यूजर्सना डिवाइस आणि डेटा, कॉल्स आणि अन्य ऑफर्स पण मिळतील.
Oppo F9 Pro स्पेक्स
Oppo F9 Pro मध्ये 6.3 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 90.8% आहे. याचा एस्पेक्ट रेश्यो 19.5:9 आहे आणि हा वॉटर ड्रॉप नॉच डिजाइन सह येतो. F9 Pro मधील नॉच मध्ये 25MP चा फ्रंट कॅमेरा, इयरपीस आणि लाइट-सेंसर देण्यात आला. F9 Pro चा बॅक पॅनल कलर्ड आहे. Oppo चा दावा आहे की फोनला पूर्णपणे ग्रेडिएंट डिजाइन देण्यात आली आहे, ज्यासाठी ग्रेडिएंट स्प्रेइंग टेक्नोलॉजी चा वापर करण्यात आला आहे. F9 Pro तीन ग्रेडिएंट कलर सनराईज रेड, ट्वाईलाईट ब्लू आणि स्टारी पर्पल मध्ये उपलब्ध होईल.
फोनच्या बॅकला फिंगरप्रिंट सेंसर आहे जो डुअल-कॅमेरा सेटअप च्या खालोखाल देण्यात आला आहे. डिवाइस मध्ये 16 आणि 2 मेगापिक्सलचा कॅमेरा सेटअप आहे. प्राइमरी कॅमेर्याच्या अपर्चर f/1.8 आहे आणि सेकेंडरी कॅमेर्याच्या अपर्चर f/2.4 आहे.
Oppo F9 Pro चे इतर कॅमेरा फीचर्स पाहता यात पोर्ट्रेट मोड, नॅचरल बोकेह इफेक्ट, 3D पोर्ट्रेट लाइटिंग यांचा समावेश आहे. AI सीन रेकोग्निशन 16 सीन ओळखू शकतो आणि सेल्फी साठी AI ब्यूटी टेक्नोलॉजी 2.1 आणि HDR चा पण समावेश करण्यात आला आहे.
F9 Pro गूगल लेंस इंटीग्रेशन सह येतो, जो ऑब्जेक्ट, टेक्स्ट, सीन्स आणि लोकेशन एक्सेस करण्याच्या कामी येतो.
Oppo F9 Pro मध्ये ओक्टा-कोर मीडियाटेक हेलियो P60 चिपसेट, 4GB/6GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तसेच याची स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येते. हा स्मार्टफोन एंड्राइड 8.1 ओरियो वर आधारित कलर OS 5.2 वर चालतो तसेच यात 3,500mAh ची बॅटरी आहे, जी एक AI बॅटरी आहे. F9 Pro मध्ये Oppo ची VOOC चार्जिंग टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. कनेक्टिविटी साठी Oppo F9 Pro मध्ये दोन 4G VoLTE सिम स्लॉट आणि स्टोरेज वाढवण्यासाठी डेडिकेटेड स्लॉट देण्यात आला आहे.