वॉटरप्रूफ आणि मजबूत बॉडीसह येणाऱ्या OPPO F27 सिरीजच्या स्मार्टफोन्सवर भारी Discount, पहा ऑफर

वॉटरप्रूफ आणि मजबूत बॉडीसह येणाऱ्या OPPO F27 सिरीजच्या स्मार्टफोन्सवर भारी Discount, पहा ऑफर
HIGHLIGHTS

Oppo ने अलीकडेच भारतात OPPO F27 सिरीज लाँच केली होती.

सिरीजअंतर्गत OPPO F27 5G आणि OPPO F27 Pro+ हे फोन्स सादर केले आहेत.

OPPO F27 5G आणि OPPO F27 Pro+ स्मार्टफोनवर भारी ऑफर्स देण्यात येतील.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo ने अलीकडेच भारतात OPPO F27 सिरीज लाँच केली होती. कंपनीने या सिरीजअंतर्गत OPPO F27 5G आणि OPPO F27 Pro+ हे फोन्स सादर केले आहेत. हे स्मार्टफोन अगदी मजबूत बॉडीसह सादर करण्यात आले आहेत, जे कितीही वरून पडल्यास फुटणार नाही. तर, हे फोन पाण्यात पडल्यासही खराब होणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात OPPO F27 सिरीजची किंमत आणि त्यावरील ऑफर्स-

Also Read: iPhone 16 Series लवकरच होणार लाँच! आगामी सिरीजमध्ये ‘हे’ Powerful फीचर्स मिळण्याची शक्यता

OPPO F27 सिरीजची किंमत आणि ऑफर्स

OPPO F27 सिरीजची किंमत आणि ऑफर्स

Oppo F27 ची किंमत 22,999 रुपयांपासून सुरू होते. तर Oppo F27 Pro Plus ची किंमत 29,999 रुपयांपासून सुरू होते. या किमतीसह दोन्ही स्मार्टफोन Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, OPPO F27 Pro+ वर 2,999 रुपयांची सूट मिळत आहे. तसेच, 1,469 रुपयांचा EMI दिला जात आहे. त्याबरोबरच, लाइनअपच्या Oppo F27 5G वर 2,299 ची सूट आणि 1,127 रुपयांचा EMI उपलब्ध आहे. Buy From Here

OPPO F27 सिरीजचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

OPPO F27 5G मध्ये फ्लॅट डिस्प्ले देण्यात आला आहे. तर, OPPO F27 Pro+ मध्ये कर्व डिस्प्ले आहे. या दोन्ही फोनच्या स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे.

प्रोसेसर

Oppo ने OPPO F27 आणि OPPO F27 Pro+ मध्ये अनुक्रमे MediaTek Dimensity 6300 आणि MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर उत्तम परफॉर्मन्ससाठी दिले आहेत.

Oppo F27 Pro Plus 5G with IP69 rating launched in India top features here

कॅमेरा

OPPO F27 5G मध्ये 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. तर, F27 Pro+ मध्ये 64MP कॅमेरा आहे. Oppo F27 मध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे आणि Oppo F27 Pro Plus मध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आले आहे. याद्वारे यूजर्स आकर्षक सेल्फी आणि उत्तम कॉलिटीसह व्हीडिओ कॉलिंग करू शकतात.

बॅटरी आणि इतर फीचर्स

Oppo F27 सिरीजच्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जे फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात. दोन्ही स्मार्टफोनमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ड्युअल सिम स्लॉट आणि USB टाइप-C पोर्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo