लेटेस्ट OPPO F27 5G फोनवर आश्चर्यकारक डील उपलब्ध, Amazon सेलदरम्यान खरेदी करण्याची संधी

लेटेस्ट OPPO F27 5G फोनवर आश्चर्यकारक डील उपलब्ध, Amazon सेलदरम्यान खरेदी करण्याची संधी
HIGHLIGHTS

Oppo चा OPPO F27 5G हा एक उत्तम स्मार्टफोन अलीकडेच भारतात लाँच

सध्या हा फोन Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलदरम्यान मोठ्या सवलतींसह उपलब्ध आहे.

SBI आणि ICICI बँकेकडून 2,299 रुपयांची सूट दिली जात आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo चा OPPO F27 5G हा एक उत्तम स्मार्टफोन अलीकडेच भारतात सादर करण्यात आला आहे. या फोनवर बंपर ऑफर्स उपलब्ध आहेत, ज्याचा लाभ घेऊन तुम्ही हा फोन कमी किंमतीत खरेदी करू शकता. ओप्पोने आपला स्मार्टफोन अतिशय अप्रतिम फीचर्ससह लाँच केला आहे. सध्या हा फोन Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलदरम्यान मोठ्या सवलतींसह उपलब्ध आहे. जाणून घेऊयात OPPO F27 5G ची किंमत आणि त्यावरील उपलब्ध डील्स-

Also Read: Jio, Airtel आणि VI चे दररोज 2GB पर्यंत डेटासह येणारे प्लॅन्स! किंमत 400 रुपयांपेक्षा कमी, पहा संपूर्ण बेनिफिट्स

OPPO F27 5G

OPPO F27 5G ची किंमत आणि ऑफर्स

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता OPPO F27 5G फोन Amazon च्या फेस्टिव्हल सेलमध्ये 22,999 रुपयांच्या किंमतीसह सूचीबद्ध आहे. ही किंमत फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, SBI आणि ICICI बँकेकडून 2,299 रुपयांची सूट दिली जात आहे. लक्षात घ्या की, ही सवलत क्रेडिट कार्डधारकांसाठी आहे. याशिवाय, हँडसेटवर 1,115 रुपयांची EMI आणि 18,750 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे.

OPPO F27 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OPPO F27 5G मध्ये 6.67 इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रीफ्रेश दर 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज उपलब्ध आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये 5G, ड्युअल सिम स्लॉट, ब्लूटूथ, Wi-Fi, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट उपलब्ध आहे.

फोटोग्राफीसाठी, या Oppo F27 5G फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुम्हाला 50MP प्राथमिक सेन्सर आणि 2MP सेकंडरी लेन्स मिळेल. Oppo च्या स्मार्टफोनमध्ये व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP सेल्फी कॅमेरा आहे. तर, बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 5000mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ही बॅटरी वेब सर्फिंग आणि काही बेसिक कार्यांसह दोन दिवसांपर्यंत टिकण्याची क्षमता ठेवते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo