Best offer! लेटेस्ट Oneplus Open फोल्डेबल फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, होणार तब्बल 20,000 रुपयांची बचत 

Best offer! लेटेस्ट Oneplus Open फोल्डेबल फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, होणार तब्बल 20,000 रुपयांची बचत 
HIGHLIGHTS

Oneplus Open फोनवर मोठ्या सवलतीसह खरेदीसाठी उपलब्ध

Amazon वर हा स्मार्टफोन तब्बल 20,000 रुपयांच्या सवलतीसह खरेदी करण्याची संधी

Oneplus Open मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Oneplus Open Discount: प्रसिद्ध फ्लॅगशिप किलर Oneplus चे स्मार्टफोन भारतीय ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. अलीकडेच कंपनीन आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन Oneplus Open सादर केला होता. मात्र, हा फोन महागडा असल्यामुळे खरेदी करण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या खिशाला चांगलाच ताण द्यावा लागणार आहे. मात्र, सध्या या फोनवर बंपर डिस्काउंट ऑफर केला जात आहे. याद्वारे तुम्ही Oneplus Open फोनवर तब्बल 20,000 रुपयांची बचत करू शकता. जाणून घेऊयात ऑफर्स-

Also Read: Jio युजर्सना आणखी एक फटका! दरवाढीसह गपचूप हटवले ‘हे’ लोकप्रिय प्लॅन्स, बघा संपूर्ण यादी

Oneplus Open वरील डिस्काउंट ऑफर

Amazon वर हा Oneplus Open फोल्डेबल स्मार्टफोन 1,39,999 रुपयांना सूचिबद्ध आहे. मात्र, हा स्मार्टफोन सध्या ऑफर्ससह तुम्हाला खरेदी करता येणार आहे. Oneplus Open च्या Amazon डिस्काउंट ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, काही निवडक बँक कार्डद्वारे या फोनवर 20,000 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच, तुम्ही ते 6,787 रुपयांच्या प्रारंभिक EMI वर सहज खरेदी करू शकता. एवढेच नाही तर, जुन्या फोनच्या एक्सचेंजवर तुम्हाला 23,050 रुपयांपर्यंतची सूट ऑफर केली जात आहे. येथून खरेदी करा

oneplus open

Oneplus Open चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Oneplus Open फोनमध्ये 6.31 इंच लांबीचा सुपर फ्लुइड AMOLED प्रायमरी डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. तर, फोनचा कव्हर डिस्प्ले 6.31 इंच लांबीचा आहे. स्पीड आणि मल्टटास्किंगसाठी, Oneplus Open फोनमध्ये Qulacomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज मॉडेल उपलब्ध आहे.

फोटोग्राफीसाठी, Oneplus Open मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 48MP SONY LYT-T800 चा आहे. तर, यात 64MP OV64B सेन्सर आहे ज्यासह OIS सपोर्ट उपलब्ध आहे. त्याबरोबरच, 48MP अल्ट्रा-वाइड सेन्सर समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 20MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनची बॅटरी 4,805mAh आहे, ज्यामध्ये 67W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo