108MP कॅमेरासह OnePlus Nord CE3 Lite 5G वर Exciting ऑफर, कमी किमतीत मिळतोय भारी स्मार्टफोन। Tech News

Updated on 23-Nov-2023
HIGHLIGHTS

OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन Amazon India वर उपलब्ध आहे.

या फोनवर 1500 रुपयांचा बँक डिस्काउंट उपलब्ध आहे.

या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

OnePlus Nord CE3 Lite 5G स्मार्टफोन अलीकडेच लाँच करण्यात आला आहे. लाँच होताच हा स्मार्टफोन हा बजेट श्रेणीतील ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय झाला. कारण यामध्ये बजेट श्रेणीमध्ये उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन Amazon India वर उपलब्ध आहे. या स्मार्टफोनवर अप्रतिम ऑफर्स दिल्या जात आहेत. चला तर मग नवीन OnePlus स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी सज्ज व्हा. बघा संपूर्ण ऑफर-

oneplus nord ce3 lite oneplus nord ce3 lite

OnePlus Nord CE 3 Lite 5G ची किंमत

OnePlus Nord CE 3 Lite च्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. त्याचा 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 21,999 रुपयांना उपलब्ध आहे. फोनवर 1500 रुपयांचा बँक डिस्काउंट उपलब्ध आहे. तसेच, हँडसेटवर 970 रुपयांचा EMI देखील उपलब्ध आहे. जर तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी स्मार्टफोन उपलब्ध आहे तर, यावर 18,700 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. येथून खरेदी करा

OnePlus Nord CE 3 Lite 5G

OnePlus ने या स्मार्टफोनमध्ये 6.72 इंच लांबीचा FHD + डिस्प्ले दिला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे आणि रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सेल आहे. सुरळीत काम करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्ट आहे.

फोटोग्राफीसाठी, हा मोबाईल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपने सुसज्ज आहे. यात पहिला 108MP मेन लेन्स, दुसरा 2MP डेप्थ आणि तिसरा 2MP मॅक्रो सेन्सर आहे. आकर्षक सेल्फीसाठी यात 16MP कॅमेरा देखील उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची मजबूत बॅटरी आहे. यात 67W SuperVOOC फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :