OnePlus Nord CE 3 5G: लोकप्रिय स्मार्टफोन मिळतोय तब्बल 9000 रुपयांचा Discount, पहा आकर्षक ऑफर

Updated on 22-Sep-2024
HIGHLIGHTS

OnePlus Nord CE 3 5G फोन जुलै 2023 मध्ये लाँच करण्यात आला होता.

OnePlus Nord CE 3 5G फोनवर 9,000 रुपयांची सूट उपलब्ध

स्मार्टफोनच्या मागील पॅनलमध्ये 50MP प्राथमिक Sony IMX890 OIS सेन्सर उपलब्ध

तुम्ही देखील फ्लॅगशिप किलर OnePlus चे चाहते असाल आणि परवडणाऱ्या किमतीत नवे 5G डिव्हाइस खरेदी करायचे असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. जर तुमचे बजेट 20 हजार रुपयांपेक्षा कमी असेल, तर हा रिपोर्ट खास तुमच्यासाठी आहे. खरं तर, ब्रँडच्या OnePlus Nord CE 3 5G फोनवर 9,000 रुपयांची सूट मिळत आहे. विशेषतः हा फोन AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा, 80W फास्ट चार्जिंग आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. जाणून घ्या किंमत आणि आकर्षक ऑफर्स-

OnePlus Nord CE 3 5G ची किंमत आणि ऑफर्स

OnePlus Nord CE 3 5G फोन Amazon वरून 8GB RAM + 128GBसह फक्त 17,999 रुपयांमध्ये 9,000 रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करता येईल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, ही किंमत लाँचच्या वेळी 26,999 रुपये होती. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी SBI क्रेडिट कार्ड वापरून पूर्ण पेमेंटवर 1,250 रुपयांची सूट आणि EMI वर 1,500 रुपयांची सूट देखील देत आहे.

एवढेच नाही तर, फोनवर एक्सचेंज ऑफरदेखील उपलब्ध आहे. तुम्हाला जुन्या मोबाईलवर 17,050 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या डिव्हाइसच्या स्थितीनुसार मिळेल. हा फोन ब्लु आणि ग्रे कलर ऑप्शन्ससह खरेदी केला जाऊ शकतो. Buy From Here

OnePlus Nord CE 3 5G चे फीचर्स आणि स्पेक्स

लोकप्रिय फोन OnePlus Nord CE 3 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. इतकेच नाही तर HDR10+, sRGB आणि 10-बिट कलर डेप्थसाठीही सपोर्ट आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, हा स्मार्टफोन Snapdragon 782G SoC सह येतो. स्मार्टफोनच्या मागील पॅनलमध्ये 50MP प्राथमिक Sony IMX890 OIS सेन्सर आणि 8MP अल्ट्रावाइड Sony IMX355 कॅमेरा आणि 2MP मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट लेन्स आहे.

OnePlus Nord CE 3

पॉवर बॅकअपसाठी, यात 80W फास्ट वायर्ड चार्जिंगसह मोठी 5000mAh बॅटरी आहे. OnePlus Nord CE 3 5G हा भिन्न डिझाइन, कार्यप्रदर्शन आणि कॅमेरा प्रणालीसह बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन शोधत असलेल्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. लक्षात घ्या की, हा फोन गेल्या वर्षी जुलै 2023 मध्ये लाँच करण्यात आला होता.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :