108MP कॅमेरासह येणाऱ्या OnePlus स्मार्टफोनवर अप्रतिम Discount ऑफर उपलब्ध, किंमत 20 हजार रुपयांअंतर्गत। Tech News

Updated on 27-Mar-2024
HIGHLIGHTS

OnePlus Nord CE 3 Lite 5G फोनवर उत्तम सवलत उपलब्ध आहे.

HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे स्मार्टफोन खरेदी केल्यास 1000 रुपयांची सूट उपलब्ध

आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा मिळेल.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता ने मागील वर्षी OnePlus Nord CE 3 Lite 5G हा सर्वोत्तम मोबाईल फोन लाँच केला होता. हा फोन लाँच होताच भारतात लोकप्रिय फोन बनला होता. हा लोकप्रिय फोन Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध आहे. या डिव्हाइसवर बँक डिस्काउंटपासून स्वस्त EMI पर्यंत ऑफर दिली जात आहे. विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 108MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात OnePlus Nord CE 3 Lite 5G वरील अप्रतिम डिस्काउंट-

हे सुद्धा वाचा: Motorola Edge 50 Fusion डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्स Leak! या दिवशी होणार भातात लाँच। Tech News

oneplus nord ce 3 lite

OnePlus Nord CE 3 Lite 5G किंमत

OnePlus Nord CE 3 Lite 5G च्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 17,499 रुपये इतकी आहे. तर, त्याचे 8GB + 256GB स्टोरेज मॉडेल 19,499 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे स्मार्टफोन खरेदी केल्यास 1000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. तर, स्मार्टफोनवर 848 रुपयांची EMI आणि 16,500 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. येथून खरेदी करा

OnePlus Nord CE 3 Lite 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus ने या स्मार्टफोनमध्ये 6.72 इंचाचा डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. फोनमध्ये उत्तम परफॉर्मन्ससाठी Qualcomm चा Snapdragon 695 प्रोसेसर देण्यात आला आहे. दोन्ही 5G फ्रिक्वेन्सीच्या समर्थनासह, स्नॅपड्रॅगन 695 5G हाय-बँडविड्थ, लो लेटेन्सी कनेक्शन प्रदान करते, जे दुर्गम आणि शहरी भागांतून निर्बाध उत्पादकता आणि मनोरंजनाची खात्री देते.

त्याबरोबरच, फोटोग्राफीसाठी OnePlus Nord CE Lite 5G च्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. पहिली लेन्स 108MP आहे आणि दुसरी आणि तिसरी 2MP लेन्स आहेत. तर, OnePlus च्या या स्मार्टफोनमध्ये आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर, पॉवरसाठी यात 5000mAh बॅटरी आहे. यात 67W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :